ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

केतन अगरवाल हत्या प्रकरण:चेतनचा कर्मचारी नीरज कुमार झाला ‘माफीचा साक्षीदार; कर्मचाऱ्याचा मोबाईल घेत गेला होता लोहगडावर वडीलांची माहिती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील बहुचर्चित केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाचा दुवा लागला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी चेतन चौधरी याच्या दुकानात काम करणारा कर्मचारी नीरज कुमार आता या खटल्यात ‘माफीचा साक्षीदार’ झाला आहे. चेतन याने नीरज कुमार यांचा मोबाईल स्वत:कडे घेत त्यांच्याकडे स्वत:चा मोबाईल दिला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या घडली त्या दिवशी मोबाईल अदलाबदल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लोहगड किल्ल्याच्या परिसरात घडलेल्या या थरारक हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरोधात पोलिसांकडे आधीच सबळ पुरावे आहेत. मात्र, आता नीरज कुमार याने माफीचा साक्षीदार होण्यास मान्यता दिल्याने या हत्येचा कट, नियोजन आणि आरोपींची घटनास्थळावरील उपस्थिती न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध करणे पोलिसांसाठी अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे बनाव उघडा पडला हत्या घडली त्या दिवशी 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तांत्रिक पुराव्यांशी छेडछाड करण्याचा कट रचला होता. चेतनने स्वतःचा मोबाईल कर्मचारी नीरजकडे ठेवला होता, तर नीरजचा मोबाईल घेऊन तो स्वतः लोहगड परिसरात गेला होता. त्या दिवशी सकाळी सव्वा सात वाजेपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चेतनचा मोबाईल नीरजकडेच होता आणि या काळात चेतनच्या मोबाईलवर आलेले सर्व फोन नीरजनेच स्वीकारले. जेणेकरून चेतनचे लोकेशन पुण्यातच दिसावे, असा यामागचा हेतू होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता नीरजच्या मोबाईलचे लोकेशन लोहगड आणि आसपासच्या परिसरात आढळून आले, ज्यामुळे चेतनचा हा बनाव उघडा पडला. सिया गोयलची कबुली दरम्यान, पोलिस कोठडीत असलेल्या सिया गोयल हिने चौकशी दरम्यान अनेक खुलासे केले आहेत. सियाच्या दाव्यानुसार, तिने केतनला तिचे आणि चेतन चौधरीचे प्रेमसंबंध असल्याचे आधीच सांगितले होते. मला हे लग्न करायचे नाही आणि मला पळून जायचे आहे, असे तिने केतनला स्पष्ट केले होते. मात्र, केतन हे लग्न मोडण्यास तयार नव्हता. आता हे लग्न रद्द होऊ शकत नाही. माझे कुटुंब अत्यंत श्रीमंत आणि प्रबळ आहे; तू कुठेही गेलीस तरी तुला शोधून काढू, अशी तंबी केतनने दिली होती, असा दावा सियाने पोलिसांसमोर केला आहे. केतनशी लग्न करण्यासाठी माझ्यावर कुटुंबाचा प्रचंड दबाव होता, अशी कबुली सियाने दिली. केतनची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली, संपन्न आणि प्रतिष्ठित असल्याने त्याच्याशी लग्न केल्यास सियाचे भविष्य सुरक्षित होईल, असे तिच्या घरच्यांना वाटत होते. याउलट, चेतनची आर्थिक स्थिती बेताची असल्याने सियाचे कुटुंबीय त्यांच्या नात्याच्या पूर्णपणे विरोधात होते. चेतनने स्वतःचा फोन दुकानात ठेवला होता चेतनचे वडील बाबूलाल चौधरींनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, सियासोबत आमचे कधीही भेटणे झाले नव्हते. तिला कधी पाहिलेदेखील नव्हते किंवा तिचे नावही ऐकले नव्हते. या घटनेनंतर तिला पहिल्यांदाच पोलिस चौकीत पाहिले. चेतन आणि ती संपर्कात असल्यास त्याबाबत कल्पना नाही. माझ्या मुलास या घटनेत फसवले जात आहे. अटकेनंतर मी त्याला भेटलो. तेव्हा त्याने मला रडत रडत सांगितले की, त्या दि‌वशी मी संबंधित ठिकाणी नव्हतो. तर दूर उभा होतो. मला फसवले जात आहे. चेतन लोहगडावर कशासाठी गेला याबाबतची कोणती माहिती त्याने कुटुंबाला दिली नव्हती. त्या दिवशी घरातून तो लवकर गेला आणि जाताना त्याने आईला सांगितले की, वडिलांना आज लवकर दुकानात पाठव. चेतन घरातून बाहेर पडल्यानंतर दुकानात गेला होता. त्याने दुकानातील एका कामगाराचा फोन स्वतःकडे घेऊन स्वतःचा फोन दुकानात ठेवला होता. कामानिमित्ताने मी बाहेर जात असून दुपारपर्यंत परत येईन असे त्याने सांगितले होते. मागील तीन वर्षांपासून चेतन व्यवसायात लक्ष घालत होता. त्याने आतापर्यंत विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये शंभर ते दीडशे ट्रॉफी मिळवल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. हे ही वृत्त वाचा केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाच केतनच्या जवळ उभी होती, मी तर दूर उभा होतो- चेतन चौधरी, चेतनने केतन अग्रवालच्या खुनाचा तपशील सांगितला पुण्यातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतनचा त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून खून केल्याचे पोलिस तपासात दिसून आले. या दोघांना न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेनंतर सियाचा प्रियकर चेतनने रडत रडत स्वत:चे वडील बाबूलाल चौधरी यांना सांगितले की, घटना घडली तेव्हा सिया केतनजवळ उभी होती, मी तर दूर उभा होतो. पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यात सिया व चेतनमध्ये २००४ कॉल झाले होते. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर