ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शरद पवारांनी घेतली राज्यसभेत खसदारकीची शपथ:रोहित पवार म्हणाले- देशातील सर्वात तरुण लोकनेता; पवारांच्या तीन पिढ्या संसदेत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या 59 वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी संसदीय कारकिर्दीचा टप्पा गाठल्यानंतर तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी व्हीलचेअरवर बसूनच ही शपथ ग्रहण केली. विशेष म्हणजे शरद पवारांच्या या निवडीमुळे आता पवार कुटुंबातील तीन पिढ्या एकाच वेळी संसदेत कार्यरत असल्याचे ऐतिहासिक चित्र पाहायला मिळणार आहे. याचसोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील शपथ घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांचा व्हिडिओ ट्विट करत ‘देशातील सर्वात तरुण लोकनेता’ असे वर्णन केले आहे. महाराष्ट्रातून माया ईवाते (भाजप), रामराव वाडकुटे (भाजप), ज्योती वाघमारे (शिवसेना) यांनी देखील आज शपथ घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आता अधिकृतपणे राज्यसभा सदस्य म्हणून संसदेत प्रवेश करणार असून, 10 एप्रिल रोजी त्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्थ पवार यांची पहिल्यांदाच राज्यसभेवर वर्णी लागली असून, ते 9 एप्रिल रोजी आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतील. या दोन्ही नेत्यांच्या संसदेतील एन्ट्रीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व आता देशपातळीवर अधिक प्रबळ होताना दिसत आहे. शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र स्तरावरील चारही सभागृहांचे सदस्यपद भूषवण्याचा बहुमान मिळवला असून, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाची सुरुवात 1967 मध्ये पहिल्या आमदारकीच्या विजयाने झाली. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या पवारांनी 1968 मध्ये पहिल्यांदा राज्याची धुरा सांभाळली, तर 1984 मध्ये बारामतीतून खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर 1985 मध्ये ते पुन्हा विधानसभेच्या रिंगणात परतले. राज्यासोबतच केंद्रातही महत्त्वाची मंत्रिपदे भूषवत त्यांनी भारतीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 1990 पर्यंत सलग सहा वेळा बारामतीचे आमदार राहिलेल्या शरद पवारांनी 1991 ते 2014 या काळात बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून नेतृत्व केले आणि 2014 पासून ते राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात, 1998-99 मध्ये लोकसभा बरखास्त झाल्याचा अल्प काळ वगळता, ते सातत्याने राज्याच्या किंवा देशाच्या कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सक्रिय सदस्य राहिले असून, आता पुन्हा एकदा राज्यसभेची शपथ घेतल्याने त्यांचा हा ऐतिहासिक संसदीय कार्यकाळ 2032 पर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर