ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर प्रयत्न:लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीखही छापणे बंधनकारक होणार, मंत्री तटकरेंचे संकेत

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करावे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने शासनाला केली आहे. त्याच्या अंमलबजावणीचे संकेत महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरेंनी दिले. अतुल भातखळकर, धनंजय मुंडे आदींच्या प्रश्नावर लेखी उत्तरात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, राजस्थान बालविवाह रोखण्यासाठी काय करते याचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा अहवाल मागवण्यात आला आहे. दरम्यान, १८ वर्षांपेक्षा कमी वयात विवाह झालेल्या मुलींचे जिल्हानिहाय प्रमाण परभणी : ४८ टक्के, बीड : ४३.७, धुळे : ४०.५, सोलापूर : ४०.३, हिंगोली : ३७.१, धाराशिव : ३६.६, असे असल्याची माहिती या प्रश्नात देण्यात आली. कशी होऊ शकेल या निर्णयाची अंमलबजावणी? प्र. : या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल? उत्तर : यात जन्मतारीख तपासणीची प्राथमिक जबाबदारी प्रिंटिंग प्रेस व्यावसायिक आणि मंगल कार्यालय मालकांवर असेल. तर अंतिम देखरेख ग्रामसेवक व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांवर असेल. यात दुर्गम भागात जन्मतारखेचे बनावट पुरावे सादर केले जाण्याची मोठी व्यावहारिक अडचण येऊ शकते. राजस्थानात तोंडी निमंत्रण, डिजिटल कार्डची पळवाट शोधली गेली. प्र.: खोटी जन्मतारीख छापणे कसे रोखता येईल? उत्तर : केवळ पत्रिकेवर जन्मतारीख छापल्याने फसवणूक पूर्णपणे रोखता येणार नाही, कारण बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटी तारीख छापली जाऊ शकते. यासाठी लग्नपत्रिका मंजुरीला थेट डिजिटल मॅरेज रजिस्ट्रेशन पोर्टलशी जोडणे आवश्यक आहे. प्र.: नव्या निर्णयाच्या उल्लंघनावर काय कारवाई होईल? उत्तर : महाराष्ट्रात सध्या मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास गुन्हा दाखल होतो. राजस्थानचा निर्णय महाराष्ट्रात अमलात आल्यास विवाह लावणारे धार्मिक व्यक्ती, आई-वडील, पत्रिका छापणाऱ्यावर एफआयआर दाखल होऊ शकतो. या गुन्ह्यासाठी कायद्यात २ वर्षांपर्यंतचा सश्रम कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची कठोर तरतूद आहे. प्र.: बालविकास कार्यकर्त्यांचे याबद्दल काय मत आहे? उत्तर: केवळ छापील पत्रिकेवर अवलंबून न राहता अधिकृत जन्म दाखला अनिवार्य करून स्थानिक प्रशासकीय यंत्रणेचे उत्तरदायित्व निश्चित करावे लागेल. वयाचा अधिकृत पुरावा थेट सरकारच्या विवाह नोंदणी पोर्टलशी लिंक करणे बंधनकारक केले पाहिजे. प्रश्न : हा निर्णय कशा पद्धतीने अमलात येऊ शकतो? उत्तर: महिला व बालविकास विभाग, विधी व न्याय विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या अभिप्रायानंतर कॅबिनेट मंजुरी मिळेल. मग त्याचे शासन निर्णयात रूपांतर होऊन अंमलबजावणी सुरू होईल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर