ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

संगीत:विनायकच्या सुमधुर गायनाने, पवनच्या ‘ तीन ताल तबला’ वादनाने पंढरपूरकर रसिक तृप्त

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा आणि चळवळ टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या करकंब नादब्रह्म कला फाउंडेशन आणि आरती साऊंड सिस्टीम, मनमाडकर परिवार यांच्या वतीने एका भव्य शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या सुश्राव्य मैफिलीने पंढरपूर आणि परिसरातील कला रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. अनिल जोशी, शुभांगी जोशी, डॉ. विनय भोपटकर, शुभांगीताई मनमाडकर, डॉ. प्रसाद कुलकर्णी, आप्पासाहेब चुंबळकर, तसेच आयोजक भगवानभाऊ मनमाडकर आणि ज्ञानेश्वर दुधाणे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे, धनंजय मनमाडकर, भगवानभाऊ मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर, संकेत कुलकर्णी, माऊली खरात, वैभव केंगार आदींनी विशेष परिश्रम घेतले. मैफिलीच्या पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम तबला वादक नयन घोष यांचे शिष्य आणि मुंबईचे युवा तबला वादक पवन सिडाम यांचे स्वतंत्र एकल तबला वादन झाले. त्यांनी ‘ताल तीनताल’ मध्ये अत्यंत तयारीचे कायदे, रेले आणि पारंपरिक बंदिशी सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यांना सतीश भट यांनी हार्मोनियमवर सुंदर लेहरा साथ केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर