ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

फर्स्टक्राय इंटेलिटोट्सच्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल:संभाजीनगरात ‘प्री-स्कूल’च्या बालकाला अडीच वर्षांच्या मुलाने 25 चावे घेतले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील फर्स्टक्राय इंटेलिटोट्स प्री-स्कूलमध्ये २२ जून रोजी शाळेतील मदतनिसाने लहान मुलांना एका खोलीत बाहेरून कडी लावून कोंडून ठेवल्यानंतर एका अडीच वर्षांच्या मुलाने २३ महिन्यांच्या चिमुकल्याला तब्बल १५ मिनिटे बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर २५ ठिकाणी चावे घेतले. शाळा प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मुख्याध्यापिकेसह व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २३ जून रोजी पोलिसांनी मुख्याध्यापिका कांचन येवले, सीईओ शुभम महेश्वरी (पुणे), मालक विजय रेड्डी (हैदराबाद), रिजनल मॅनेजर मंगेश मुसळे, महाराष्ट्र हेड अनुराधा सिंग आणि मदतनिसाविरुद्ध बीएनएस कलम १२५(अ), १२५(ब), ३१८(३), ३५१(२) व बाल न्याय कायदा कलम ७५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्री-प्रायमरीसाठी असे आहेत सुरक्षानियम प्री-प्रायमरी वर्गांसाठी सरकारचे नियम आहेत. या शाळेत बाहेरील व्यक्तींना प्रवेश नसतो. वर्गखोल्या हवेशीर, सुरक्षित आणि मुलांसाठी अनुकूल असाव्यात. प्राथमिक उपचारांची सुविधा असावी. विद्यार्थ्यांना एकटे सोडू नये. शाळेत प्रथमोपचार पेटी आणि प्रशिक्षित कर्मचारी असणे अनिवार्य आहे. तक्रार मिळतात डे केअर सेंटर बंद करण्याचे आदेश तक्रार मिळताच पाहणी करण्यात आली. तपासणीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ते ‘डे केअर सेंटर’ आहे. सुरक्षेची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. हे ‘डे केअर’ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी नोंदणी केलेले प्रमाणपत्रही दिले नाही. – जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी शाळेचा निष्काळजीपणा, पालकांना धमकीही देवळाई चौक परिसरातील वकील फिर्यादीनुसार, व्यवस्थापनाने अडीच तास माहिती लपवली. फुटेज कट करून दिले. “आम्ही पैसे देतो, तक्रार करू नका, कुणी काही बिघडवू शकत नाही,’ अशी धमकी दिली. सीसीटीव्हीत वास्तव उघड सीसीटीव्ही फुटेजनुसार सकाळी ११ ते ११:३० च्या सुमारास एका मदतनीस महिलेने ३ मुलांना खोलीत कोंडले. नंतर एका अडीच वर्षांच्या मुलाने फिर्यादीच्या मुलाला मारहाण करत २५ ठिकाणी चावे घेतले. दुसऱ्या लहान मुलीलाही मारले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर