ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही सर्वदूर पाऊस:आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी, दोन दिवसांच्या पावसात भरुन निघाली निम्म्यापेक्षा जास्त पावसाची तूट

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यंदा सुपर अलनिनोच्या प्रभावामुळे जून महिन्याचे सुरूवातीचे २० दिवस उलटूनही चांगला पाऊस बरसलेला नव्हता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची सुरूवात झाली आहे. या दोन दिवसातच झालेल्या पावसाने जून महिन्याच्या सरासरी पावसामध्ये आतापर्यंत असलेली तूट निम्म्यापेक्षा जास्त भरुन काढली असल्याचे दिसत आहे. त्यातच बुधवारी २४ जून रोजी सकाळपर्यंत पडलेल्या पावसाने तीन तालुक्यातील आठ महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. दरम्यान या पावसाने बळीराजा सुखावला असून, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये रखडलेल्या पेरण्यांना सुरूवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जून महिन्यात पावसाने चांगलीच दडी मारली होती. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. सुपर अलनिनोच्या प्रभावामुळे जून महिन्यात पाऊस येणार की नाही, अशी शंका व्यक्त होत असतानाच जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी झाली. त्यामुळे जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या १३१.१ मिमी पावसाची निम्मीअधिक तूट या पावसाने भरुन निघाली आहे. बुधवारी जिल्ह्यात २३.३ मिमी पाऊस झाला असून, आतापर्यंत उर्वरित. पान ४ तालुका पाऊस Âयवतमाळ २८.२ Âबाभुळगाव ५५.१ Âकळंब ४८.७ Âदारव्हा ७१.१ Âदिग्रस ७५.० Âआर्णी ५४.५ Âनेर ९९.२ Âपुसद ४६.९ Âउमरखेड ६०.९ Âमहागाव ३४.३ Âवणी ११४.१ Âमारेगाव ७३.५ Âझरी ७८.१ Âकेळापूर ६०.७ Âघाटंजी ४९.८ Âराळेगाव ६०.६ एकूण ६१.६ ४७ टक्के पाऊस जिल्ह्यातील हा पाऊस सरासरी पावसाच्या ४७ टक्के इतका झाला आहे. जूनमध्ये झालेला पाऊस चांगल्या पावसाशिवाय खरीप पेरणी करु नका ^जिल्ह्यात पावसाची सुरूवात झाली मात्र बऱ्याच भागात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेला नाही. नेर, झरी, वणी भागातच चांगला पाऊस झाला. २६ जूननंतर सर्वदूर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. त्यामुळे १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करु नये. मनोज ढगे, जिल्हा कृषी अधिकारी, यवतमाळ. केवळ १० टक्के आटोपल्या पेरण्या यंदा जिल्ह्यात ९ लाख हेक्टर वर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे. असे असताना जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने पेरण्या खेळंबल्या होत्या. दोन दिवसात पावसाने काही भागात पेरण्यांची सुरूवात झाली असून, मंगळवारी २३ जूनपर्यंत ८१ हजार ६४४ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर