ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

लासलगावी शोभायात्रा, महाप्रसाद अन् महेश वंदनेतून भक्तीचा जागर:सत्यनारायण, महापूजा आणि शोभायात्रेतून सामाजिक एकोप्याचा संगम‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लासलगाव सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने शहरात महेश नवमी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. धार्मिक विधी, भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमातून समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक परंपरांचा जागर करण्यात आला. मंगळवारी (२३) सकाळी भगवान शंकरांचा अभिषेक सूरज मालपाणी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला. त्यानंतर विधिवत सत्यनारायण महापूजा पार पडली. पूजनानंतर माहेश्वरी समाजाच्या वतीने पारंपरिक वाद्यांच्या गजरात, जयघोष आणि भगवान महेश यांच्या नामस्मरणात गावातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. यानंतर लक्ष्मीनारायण मंदिरात भगवान महेश यांची आरती व महेश वंदना करण्यात आली. दुपारी आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. कार्यक्रमास लासलगाव व परिसरातील सकल माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी, महिला, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश नवमी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोप्याचा आणि धार्मिक संस्कारांचा संदेश देण्यात आला. दरम्यान, आयोजित उत्सवामुळे समाजबांधवांमध्ये उत्साहाचे आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले. नाशिक शहरात रविवार कारंजा येथून मुख्य मिरवणूक निघणार होती, मात्र, ऐन मिरवणुकीच्या वेळेसच पाऊस सुरू झाल्याने मिरवणूक रद्द करण्यात आली. नाशिकरोड येथेही मिरवणूक याच कारणाने रद्द करण्यात आली. इतर धार्मिक कार्यक्रम मात्र नियोजनानुसार पार पडले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर