ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

सिगारेट न दिल्याने वृद्धाचा खून:अमरावतीत एकाला अटक, दोन आरोपी फरार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सिगारेट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार, २४ जून रोजी सकाळी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी-गोपालनगर मार्गावरील सूतगिरणीजवळ उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी काही तासांतच एका आरोपीला अटक केली असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. मृत व्यक्तीचे नाव माणिकराव बळीरामजी बोरकर (६५, रा. गोदावरी कॉलनी, अमरावती) असे आहे. माणिकराव यांना दारूचे व्यसन होते आणि ते अनेकदा दोन-दोन दिवस घराबाहेर राहत असत. २२ जून रोजी सकाळी ते त्यांच्या कुटुंबातील एका लहान मुलाच्या गुल्लक मधील अंदाजे तीन ते चार हजार रुपये घेऊन घराबाहेर पडले होते. नेहमीप्रमाणे ते परत येतील असे वाटल्याने कुटुंबीयांनी सुरुवातीला त्यांची हरविल्याची तक्रार दाखल केली नव्हती. बुधवारी सकाळी सूतगिरणीजवळील फूटपाथवर माणिकराव यांचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळाला भेट दिली. मृतदेहावर धारदार शस्त्राचे वार आणि रक्ताने माखलेले कपडे असल्याने त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मृत माणिकराव यांचा मुलगा जितेंद्र (३२) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान, उद्देश उर्फ चिकू संजय खरड (२७, रा. मायानगर, अमरावती) याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या तपासात समोर आले की, मंगळवारी रात्री माणिकराव हे सूतगिरणीजवळ दारू पित बसले होते. त्यावेळी उद्देश हा त्याच्या दोन सहकाऱ्यांसह त्यांच्या बाजूला दारू पित होता. उद्देशच्या एका सहकाऱ्याने माणिकराव यांच्याकडे सिगारेट मागितली. माणिकराव यांनी सिगारेट देण्यास नकार दिल्याने उद्देश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घातला. या वादातून तिघांनीही माणिकराव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर