ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

गोरक्षक सुरोशेंच्या मारेकऱ्यांवर‎मकोका अंतर्गत कारवाई करा‎:हिंदू समाजाचा तहसीलवर धडकला मोर्चा, प्रशासनाला दिले निवेदन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उमरखेड जवळील मौजे सुकळी शिवारात गोवंश तस्करी रोखताना एका धाडसी गोरक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण यवतमाल जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महागाव तालुका तहसीलदार कार्यालयावर समस्त हिंदू समाज, गोरक्षक बांधवांच्या वतीने मोर्चा काढून मागणी करण्यात आले. २४ मे रोजी मौजे सुकळी (ता. उमरखेड) येथे गोवंश तस्करी होत असल्याचे पाहून गोरक्षक स्व. गजानन मारुती सुरोशे यांनी अत्यंत धैर्याने आणि गोसेवेच्या भावनेतून स्वतःचा जीव धोक्यात घालून तस्करांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते एकटे असतानाही त्यांनी तस्करांचा सामना केला. मात्र, निर्दयी आणि क्रूर आरोपींनी त्यांच्यावर दगड व काठ्यांनी अमानुषपणे हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ महागाव तालुक्यातील समस्त हिंदू समाज, गोरक्षक संघटना व नागरिकांच्या वतीने शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, स्व. गजानन मारुती सुरोशे यांना “शहीद गोरक्षक’ घोषित करून त्यांच्या कुटुंबीयातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि किमान ५० लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, महाराष्ट्र गोहत्या प्रतिबंधक कायद्याची संपूर्ण राज्यात कठोर व प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच अवैध गोवंश तस्करी तातडीने बंद करावी, गोरक्षकांना शासनाकडून विशेष सुरक्षा प्रदान करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जिल्हानिहाय विशेष नियंत्रण यंत्रणा आणि विशेष पथक स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करून “स्व. गजानन सुरोशे यांचे बलिदान संपूर्ण हिंदू समाज कधीही विसरणार नाही. जर शासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे,’ असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या मोर्चात महागाव तालुक्यातील समस्त हिंदू समाज व गोरक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर निवेदन तहसीलदार अभय मस्के, नायब तहसीलदार गजानन पराते, महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांनी स्वीकारले. या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महागाव पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जिल्हानिहाय विशेष नियंत्रण यंत्रणा आणि विशेष पथक स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करून “स्व. गजानन सुरोशे यांचे बलिदान संपूर्ण हिंदू समाज कधीही विसरणार नाही. जर शासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे,’ असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर