ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

युवा संवाद उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक:मुख्‍यमंत्री फेलोशिप बद्दल रीक्षार्थींना माहीती; 1 जून रोजी फेलोशिप संदर्भात मार्गदर्शन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत २१ एप्रिल ते १ जून या कालावधीत राबवण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा सोमवारी १ जून रोजी विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्राने समारोप करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित या समारोपीय मार्गदर्शन सत्राला जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे, मुख्‍यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी आणि कुणाल पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून आयेाजित या संपूर्ण उपक्रमात प्रत्येक सोमवारी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, भारतीय वन सेवेतील अधिकारी रॉबीन बंसल, रेवैयाह डोंगरे, एन. भुवनेश्वर आणि उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे, गंगाधर होवाळे, तहसीलदार हेमकृष्ण पिसदे यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रांना स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवा संवाद कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात मुख्‍यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी आणि कुणाल पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध फेलोशिप्स, करिअर संधीबद्दल मार्गदर्शन केले. या सत्रामध्ये मुख्यमंत्री फेलोशिप महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा प्रशासनासोबत केल्या जाणारे कामाचे स्वरुप, शासन व्यवस्थेतील अनुभव, तसेच धोरणनिर्मिती आणि अंमलबजावणी यामधील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेलोशिप्सची माहिती देण्यात आली. त्यामध्ये लँप फेलोशिप, गांधी फेलोशिप, यंग इंडिया फेलोशिप, टिच फॉर इंडिया फेलोशिप, क्रिस्प फेलोशिप आणि नेहरू फेलोशिप यांसारख्या संधींबद्दल माहिती दिली. मराठीमुख्‍यमंत्री फेलोंच्या कामाचे कौतुक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी फेलोशिपमधून मिळणाऱ्या संधी, शिकण्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष प्रशासनात काम करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. मुख्‍यमंत्री फेलोंच्या कामाचे तोंडभरून कौतुकही यावेळी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर