ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मयंक लोहार हत्येवर अभिनेते स्वप्नील राजशेखर संतापले:म्हणाले- डब्यात 100 लोक होते, व्हिडिओ काढले पण कुणीच मदत केली नाही

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई लोकलमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार याची झालेली निर्घृण हत्या संपूर्ण राज्याला हादरवून गेली आहे. या घटनेवर आता मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, डब्यातील प्रवाशांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘शंभर प्रवासी होते, पण मदतीला कुणीच आलं नाही’ स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, “रेल्वेच्या डब्यात किमान शंभर लोक असतील… घटनेचे व्हिडीओ काढले गेले… पण कुणी मयंकला मदत केली नाही, ना खुन्याला पकडण्याचा प्रयत्न केला. हे तितकंच गंभीर आहे.” नेटकऱ्याच्या कमेंटला दिलं उदाहरण स्वप्नील यांच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने, “मयंकच्या जागी एखादी मुलगी असती तर काही जण हिरोगिरी दाखवायला पुढे आले असते,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर उत्तर देताना स्वप्नील यांनी एका अलीकडील घटनेचा दाखला दिला. त्यांनी सांगितले की, एका हत्यारबंद व्यक्तीने मुलीवर चाकूने हल्ला करत असताना एका धाडसी तरुणाने पुढे येत त्याला सॅकने मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतरही लोक पुढे आले आणि अखेर हल्लेखोराला पकडण्यात यश आले. ‘खुनी स्टेशनबाहेर गेला, तरी कुणी आरडाओरडा केला नाही’ स्वप्नील राजशेखर यांनी पुढे प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, “खुनी डब्यातून उतरून गर्दीतून सहज स्टेशनबाहेर गेला. त्यावेळी डब्यातील प्रवाशांनी आरडाओरडा केला असता किंवा बाहेरच्या लोकांना ‘तो खुनी आहे, त्याला अडवा’ असं सांगितलं असतं, तर रेल्वे पोलिसांनी त्याला त्याचवेळी पकडलं असतं.” ‘फक्त बघ्याची भूमिका का?’ मयंकला वाचवणं शक्य नव्हतं, हे काही प्रमाणात मान्य करता येईल. मात्र, खुन्यानंतरही प्रवाशांनी कोणतीही सक्रिय भूमिका का घेतली नाही, असा सवाल स्वप्नील यांनी उपस्थित केला. “मदत केली नाही, वार थांबवले नाहीत, खुन्याला पकडलं नाही, हे सगळं मान्य. पण तो डब्यातून उतरल्यावरही लोक शांत का राहिले?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे म्हटले. संबंधित बातमी वाचा.. मुंबई धावत्या लोकलमध्ये हत्याकांड, आरोपीला अटक- VIDEO: गर्दीत चाकूने भोसकून पळून गेला होता मुंबईत मान्सूनच्या पहिल्या पावसात लोकल ट्रेनमध्ये दरवाजा उघडा ठेवण्यावरून झालेल्या वादामुळे एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाचा जीव घेतला. मृताची ओळख 22 वर्षीय मयंक लोहार अशी झाली. आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनुसार, ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 10:42 वाजता अंधेरी आणि बोरीवली स्टेशनदरम्यान चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात घडली. ट्रेन बोरीवली स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच आरोपी रोशन सुवर्णा धावत्या ट्रेनमधून उडी मारून पळून गेला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर