ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मोहरममध्ये घातपातासाठी ‘पेनकिलर’ म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या:फय्याज निसारकडून विषाच्या 14,900 गोळ्या जप्त

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दक्षिण मुंबईतील भायखळा भागात मोहरमच्या अशुरा मिरवणुकीत पेनकिलर आणि इम्युनिटी बूस्टरच्या नावाखाली उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झिंक फॉस्फाइडच्या विषारी गोळ्या वाटणाऱ्या पुण्यातील विमाननगर येथे राहणाऱ्या उच्चशिक्षित तरुण फय्याज निसार प्रेमजीला (३९) अटक करण्यात आली. त्याच्याकडून कॅप्सूलरूपात तयार केलेल्या १४,९०० विषारी गोळ्या आणि ५० किलो घातक रासायनिक पावडर जप्त करण्यात आली आहे. एका जागरूक महिलेची तत्परता आणि रुग्णालयातील एमएलसी (मेडिको लीगल केस) अहवालामुळे या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा घातपात टळला आहे. फय्याज निसार २०२५ मध्ये इराण-इराकमध्ये जाऊन आला होता. त्यामुळे त्याचे आयसिसशी काही कनेक्शन आहे का, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. ३०,००० कॅप्सूल्स बनवल्याची कबुली मुंबई परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त जयंत मीणा यांनी सांगितले की, फय्याजने ऑनलाइन बाजारातून ३०,००० रिकाम्या कॅप्सूल्स आणि मोठ्या प्रमाणावर घातक रासायनिक पावडर मागवली होती. तो स्वतः राहत्या ठिकाणी या रिकाम्या कॅप्सूल्समध्ये प्रत्येकी १-१ ग्रॅम झिंक फॉस्फाइड भरून गोळ्या तयार करत होता. मिरवणुकीत त्याने दिलेल्या गोळ्या खाल्ल्यावर काही जणांना उलट्या, मळमळ होऊ लागली. ही बाब एका महिलेच्या लक्षात आल्यावर तिने पोलिसांना माहिती कळवली. आरोपीची बहीण, आई इराणमध्ये वास्तव्यास फय्याज निसार प्रेमजी २०२५ मध्ये इराण, इराकला गेला होता. त्याची आई आणि बहीण सध्या इराणमध्ये राहतात. चौकशीत ही बाब समोर आल्यावर मुंबई पोलिस, एटीएस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहे. सुरक्षा विश्लेषकांच्या मते, इराण-इराक हे शिया समुदायाचे केंद्र आहे. आणि आयसिस हा सुन्नी वहाबी गट असल्याने फय्याजचा आयसिसशी थेट संबंध असण्याची शक्यता कमी आहे. तरीही पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत. फय्याज बीबीए पदवीधारक असून त्याचे वडील पुण्यात नामांकित पेंट कंपनीचे मालक आहेत. घातपातासाठी तो १५ दिवसांपासून मुंबईत मुक्काम ठोकून विषारी कॅप्सूल्स तयार करत होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर