ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

RPF असल्याचे सांगत फसवणूक करणारे तिघे अटकेत:हिंगोली पोलिसांनी मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या, अनेक गुन्हे उजेडात येणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रेल्वेचे पोलिस अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून राज्यभरातील फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमकुमार माकोडे यांना एका मोबाईल नंबर वरून फोन आला. कळमनुरी शहरातील वार्ड क ०६ मधील खुशबू मोहन पाटील या मुलीचा खंडवा येथे रेल्वे रूळावर कटुन मृत्यू झाला असून मयताचे नातेवाईक खुप गरीब आहेत. शव पाठवण्यासाठी आईस बॉक्सची गरज आहे, तवढे पैसे त्यांच्याकडे नाहीत. तुम्ही ५००० रू ची मदत करा, फोन करणाऱ्याने सांगितले. आपण खंडवा पोलिस निरीक्षक मनोजकुमार बोलत असल्याचेही तो म्हणाला. त्यावर कळमनुरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील यांच्याकडून माणुसकीच्या नात्याने पैसे ऑनलाईन पाठविले. त्यानंतर काही वेळाने सपोनि गजानन बोराटे पोस्टे वसमत ग्रामीण यांना सुध्दा कॉल करून वसमत शहरातील खुशबू मोहन पाटील या मुलीचा खंडवा येथे रेल्वे रूळावर कटुन मृत्यू झाला असून सारखीच घटना सांगितली. त्यांनी तेथून सुध्दा काही रोख रक्कम ट्रान्सफर करून घेतली. सदर घटनेबाबत हिंगोली पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता कोणत्याही शहरामध्ये खुशबू, मोहन पाटील या मुलीचे अपघाती निधन झाल्याचे दिसून येत नव्हते. तसेच रेल्वे पोलिस निरीक्षक यांचे फोनवरील संभाषन संशयास्पद दिसत होते. त्यावरून सायबर काईम मार्फत सदर मोबाईल नंबरची अधिक माहिती घेतली असता सदर प्रकारे फसवणूक करणारी टोळी मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील रहली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुना गावची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, साईनाथ कंठे, हरीभाऊ गुंजकर, शिवाजी जालमिरे, ज्ञानेश्‍वर गोरे, दत्ता नागरे, नरेद्र साळवे, आकाश टापरे, इरफान पठाण, प्रदीप झुंगरे, महिला पोलिस कर्मचारी प्रणिता मोरे यांची दोन पथके मध्यप्रदेशाकडे रवाना झाली. या पथकाने अमित कमलेश कुरमी, विरसींग गोपाल गौंड, भारत दयाराम कुरमी, सिताराम भारत कुरमी (सर्व रा. जुना, ता. रहली, जि. सागर, राज्य मध्य प्रदेश) यांनी गुन्हा केल्याची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी अमित, विरसिंग व भारत यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी राज्यभर अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामुळे आता या प्रकरणी एक मोठे रॅकेट उघडकीला येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर