ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

विठ्ठल भक्तांसाठी 18 महिन्यांत दर्शन मंडप, स्काय वॉक उभारणार:624 मीटर लांबीच्या कामाला 103 कोटी 79 लाखांच्या निधीतून गती

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंढरपुरात येणाऱ्या लाखो विठ्ठल भक्तांसुलभ, सुखकर दर्शनासाठी, दर्शन रांग सुटसुटीत, सुव्यवस्थित करण्यासाठी नवीन दर्शन मंडपाचे काम सुरु करण्यात आलेले असून येत्या १८ महिन्यात भव्य दर्शन मंडप, स्काय वॉक बांधून पूर्ण होईल अशा गतीने काम सुरु करण्यात आलेले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ऊन, वारा, पाऊस, थंडी पासून सुटका करण्यासाठी आणि विठ्ठल दर्शन सुखाचे करण्यासाठी मंदिर समितीने तिरुपती बालाजी च्या धर्तीवर नवीन दर्शन मंडपाचे काम हाती घेतले आहे. स्मशान भूमी जवळ असलेल्या पत्राशेड दर्शन रांगेच्या बाजूला हा नवीन दर्शन मंडप उभा राहत आहे. यासाठी राज्य शासनाने १०३ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी दिला. मंदिर समितीकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित आराखड्यानुसार, हा दर्शन मंडप अतिशय देखणा आणि पारंपरिक दगडी वास्तुकलेचा फील देणारा असेल. त्यावर विठ्ठल-रुक्मिणीच्या आणि संतांच्या सुंदर प्रतिमा रेखाटण्यात येणार असून एकाच वेळी हजारो भाविक यामध्ये सुलभतेने थांबू शकतील. तसेच नवीन ६२४ मीटर लांबीचा स्काय वॉक उभा करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना गर्दीतून न जाता सुरक्षितपणे चालत येणे शक्य होईल. {क्षेत्रफळ: १६ हजार चौरस मीटरचा २ मजली दर्शन मंडप. {स्काय वॉक: दर्शन मंडप ते विठ्ठल मंदिर पूर्व प्रवेशद्वार असा १०५० मीटर्स लांबीचा स्काय वॉक. {क्षमता: प्रत्येक मजल्यावर १५०० भाविक क्षमतेचे दोन हॉल (वातानुकूलित हॉल). {सुविधा: दर्शन मंडपास ६ लिफ्ट आणि २ रॅम्प, सीसीटीव्ही, ३० पास स्कॅनिंग काउंटर, हिरकणी कक्ष, उपहार गृह आदी. {टोकन सुविधा: हा दर्शन मंडप उभा राहिल्यानंतर टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात येईल. ६ हजार भाविकांची सोय होणार. पारंपरिक दगडी वास्तुकलेचा देणारा फील

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर