ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आता ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासाठी एसटी स्वस्तात मिळणार:परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली विधान परिषदेमध्ये माहिती

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासारख्या शुभप्रसंगी खासगी वाहनांचा महागडा खर्च परवडत नाही. म्हणूनच अशा प्रसंगी अत्यंत माफक आणि सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याची एक अभिनव योजना राबवण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. सुनील शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे आणि ॲड. निरंजन डावखरे यांनी भाग घेतला. त्याला उत्तर देताना परिवहनमंत्र्यांनी ही घोषणा केली. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मालवाहू वाहनांमधून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर आता केवळ दंडात्मक कारवाई न करता, त्यांचे वाहन परवाने थेट रद्द करण्याचे कठोर निर्देश देण्यात आले आहेत. बळी घेणाऱ्यांवर थेट गुन्हे परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, अलीकडेच घडलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे १३ आणि ११ निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या दोन्ही दुर्घटनांमध्ये ‘मालवाहू वाहनांमधून केलेली अवैध प्रवासी वाहतूक’ हेच मुख्य कारण होते. केवळ चालकांवरच नव्हे तर संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लवकरच ५ लाख मदत देण्यात येईल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर