ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

आदर्श शाळांच्या निधीचा पूर्ण उपयोग करा:शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यातील आदर्श शाळांसाठी शासनस्तरावर पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. इमारत बांधकाम कमी किंमतीत झाले असले तरी शाळांमधील इतर सुविधांसाठी हा निधी उपयोगात आणता येणार आहे. यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता घ्यावी, तसेच उर्वरित निधी शाळेतील सुविधांसाठी उपयोगात आणावा, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवार २८ जून रोजी जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला दिले. डॉ. भोयर यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विभागातील पीएमश्री, सीएमश्री आणि आदर्श शाळांचा आढावा घेतला. बैठकीला उपसंचालक नीलिमा टाके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, सहाय्यक शिक्षण संचालक अमोल पवार, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम व इतर अधिकारी उपस्थित होते. विभागातील काही मोजक्याच आदर्श शाळांचे बांधकाम होऊ शकले नाही. त्यामुळे ज्या शाळांचे काम प्रगतीपथावर आहे, अशा शाळांचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे. शाळा बांधकामांमध्ये कमी किमतीच्या निविदा प्राप्त झाल्यामुळे बांधकामावरील खर्चात बचत झाली आहे. हा निधी शाळेच्या विकासासाठी उपयोगात आणणे शक्य आहे. उर्वरित निधीबाबत प्रस्ताव तयार करून इतर उपयुक्त सुविधा निर्माण कराव्यात. या ठिकाणी अभ्यासिका, संगणक सुविधा यासारख्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगात येतील अशा सुविधा उभारण्यात याव्यात, अशी सुचना डॉ. भोयर यांनी बैठकीत केली.शासकीय शाळांचा स्वच्छतेचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आदर्श शाळेचे बांधकाम करताना या शाळेचा स्वच्छतेचीही काळजी राखली जाईल, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. आदर्श शाळा या खऱ्या अर्थाने आदर्श व्हाव्यात यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजनाच्या निधीतून मागणी करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील शाळांमधील स्वच्छतागृहांचा आढावा घेऊन या ठिकाणच्या सुविधा निर्माण करण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर