ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

टीईटी पेपरफुटीचा निषेध:युवक काँग्रेसने जाळला शिक्षणमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महा-टीईटी) परीक्षेच्या कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ अमरावती शहर (जिल्हा) युवक काँग्रेसने आज, रविवारी सकाळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या पुतळ्याचे दहन केले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे आणि एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष स्वराज पोटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. भिवंडी येथून पेपरफुटीची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर रविवारी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी पुन्हा एकदा खेळ झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. नीट च्या पेपरफुटीची घटना अगदी ताजी असतानाच टीईटीचा पेपर फुटणे हे कदापिही क्षम्य नाही, असे युकॉचे म्हणणे आहे. विशेष असे की पेपरफुटीच्या दोन्ही घटना महाराष्ट्रातच झाल्याने दोन्ही शिक्षणमंत्री अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि या प्रकरणातील सत्य समोर आणावे, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. दरम्यान या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यातील परीक्षा पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, हा मुद्दाही यावेळी केली. टीईटीच्या नव्या परीक्षेची तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही केली. आंदोलनात इतर पदाधिकारी सूरज खैरे, अनिकेत क्षीरसागर, मयूर गोटखडे, राज ठाकरे, योगेश घोडेस्वार, राम बोबडे, मयूर कांडलकर, सूरज चव्हाण, ओम उंबरकर, पियुष डाबेराव, अमित पाटील, प्रशांत येवले, लकी खवले, प्रतीक वऱ्हेकर, उज्वल टिकार, वैभव कराळे, स्वप्नील पंडित, उमेर शेख, सिद्धन शेख, सुजय चौधरी आदी सहभागी झाले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर