ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पावसाचा अंदाज:जुलैमध्ये 10 तारखेनंतर पावसाची विश्रांती, चक्राकार वारे वाहून पहिल्या आठवड्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडणार‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो दाब पुढे सरकण्यासाठी आणि पाऊस बरसण्यासाठी चक्राकार वारे एक जुलै नंतर सर्वदूर झपाट्याने वाहतील आणि आभाळात काळ्या ढगांची गर्दी होऊन २ ते ८ जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह विदर्भात सर्वदूर समाधानकारक पाऊस बरसेल, बुलडाणा जिल्ह्यात मात्र जुलै महिन्यात १० तारखेनंतर पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज येथील हवामान अभ्यासक प्रकाश पारेख यांनी वर्तवला आहे यंदा अल निनो च्या प्रभावामुळे अरबी समुद्र व पश्चिम बंगालच्या उपसागरात ज्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निर्माण व्हायला पाहिजे तो निर्माण झाला नाही. त्यामुळे यंदा पाऊस जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कुठे कमी तर कुठे पाऊस बरसला नाही. असे सांगून प्रकाश पारेख म्हणाले की, आता ती परिस्थिती जून नंतर जुलै च्या प्रारंभापासून बदलेल. ही परिस्थिती बदलल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र आठवडाभर समाधानकारक पाऊस पडेल. हा अंदाज शेतकरी व नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी येणार आहे. प्रकाश पारेख, हवामानतज्ज्ञ समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन भारतात काळे ढग आणण्यासाठी मेडल ज्युलियन व इंडियन ओशन डायपोल ही पाऊस बरसणारी सिस्टिम पण एक जुलै नंतर तयार होणार आहे याचाही फायदा सर्वत्र पाऊस बरसण्यावर होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर