ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी घसरली; काॅपीमुक्त अभियानाचा परिणाम, मुलींनीच मारली बाजी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्याचा यावर्षी बारावीचा निकाल ८२.८६ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी ६ टक्क्यांनी घसरली आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे निकालावर परिणाम झाल्याचे शैक्षणिक वर्तुळातून बोलले जात आहे. तर अपेक्षे प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून १४४९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४१९८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामध्ये ३८३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून २५०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६५३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २३३९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. जिल्हातील एकूण ११७६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८२.८६ टक्के लागला आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल ८८.५४ टक्के लागला होता. यावर्षी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रभारी शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या पथकाने कॉपीमुक्त अभियान राबविले. प्रत्येक केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले होते. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले होते. संवेदनशील परिक्षा वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु ठेवण्यात आला होता. दरम्यान, यावर्षीही अपेक्षे प्रमाणेत मुलींनीच निकालामध्ये बाजी मारली अाहे. या परिक्षेसाठी जिल्हयातील ७५९० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ५८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ७६.८१ टक्के आहे. तर जिल्ह्यातून ६६०८ विद्यार्थीनींपैकी ५९३५ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थीनींची टक्केवारी ८९.८१ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९२.८६ टक्के जिल्ह्यात विज्ञान शाखेत ७५४४ पैकी ७००६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९२.८६ टक्के आहे. कला शाखेतून ५७७३ विद्यार्थ्यापैकी ४१०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७१.०५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून ६९५ पैकी ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७१.७९ टक्के लागला आहे. तसेच किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात १८६ पैकी १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८४.९४ टक्के लागला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर