ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दांडगाव येथील जुन्या रिठावर वाघाचे ठसे व दर्शन

1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यात पुन्हा एकदा वाघाची एन्ट्री झाली असून दांडगाव  येथील जुन्या रिठावर वाघाचे ठसे आढळून आले.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नदी काठावर असलेल्या शेतकऱ्यांना आता शेतात जायचे कसे आणि ओलीतातील पीक काढायचे कसे असा प्रश्न पडलेला आहे.

मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या दांडगाव जुना रिठावर आज दिनांक 25 मार्च 2025 रोज मंगळवारला सकाळी काही शेतकऱ्याला वाघ दिसला.त्यांनी गावात येऊन वाघ असल्याचे सांगितले.त्या मुळे गावाती काही नागरिकांनी प्रत्यक्ष जावून पाहणी केली असता त्यांना वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले.वाघ जुन्या गावात असल्याने गावकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वरोरा जाण्याच्या मार्गांवर दांडगाव येथील हे जुने रिठ असल्याने या रस्त्याने रहदारी मोठ्या प्रमाणात असते. याच मार्गांवर वाघाचे अस्तित्व असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गावकऱ्यांनी लागेच ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाची चमू त्या परिसरात वाघाचा शोध घेण्याकरिता दाखल झाली आहेत.

वनविभागाची चमू दांडगाव परिसरात पोहचले असून प्रथमदर्शी वाघाचेच ठसे असल्याचे निष्पन्न होत आहे. परिसरात वनविभागाच्या वतिने कॅमेरे लावले जात आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. वरिष्ठाना कळवून वाघाचा शोध घेतला जात आहे.
                   शंकर हटकर
       वनपरीक्षेत्र अधिकारी मारेगाव

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर