ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

35 लाखाचं फ्रेंडली लोन देणं सराफाला पडलं महागात; पैसे परत मागताच 2 तरुणांचं मोठं कांड

12 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फ्रेंडली लोन म्हणून दिलेले 35 लाख रुपये परत मागितल्याने सराफा व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे येथे उघडकीस आला. या प्रकरणी हितेश जैन, केहुल जैन यांच्यावर 30 जुलै रोजी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

तक्रारदार कैलास राईगर (47) हे झवेरी बाजारात दागिन्यांचा व्यवसाय करतात. त्यांनी सौरभ जैन याला चार महिन्यांपूर्वी 35 लाख रुपये फ्रेंडली लोन म्हणून रोख स्वरूपात दिले होते. ही रक्कम परत मागितल्याने सौरभचा मोठा भाऊ हितेश जैन याने 29 जुलैच्या रात्री फोन करून कैलास यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. लोनची रक्कम परत मागितल्याने आरोपींनी सराफाला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हितेशने त्यांना वांद्रे परिसरातील लकी जंक्शन येथे भेटण्यासाठी बोलावले. तेथे पोहोचताच, हितेश आणि त्याचा भाऊ केहुल यांनी त्यांना धक्काबुक्की केली. गस्तीवर असलेल्या पोलिसांचे वाहन दिसताच त्यांनी गाडी पुढे नेली. त्यानंतर, कैलास यांना गाडीत बसवून माहिम परिसरात नेले. जिवे मारण्याची धमकी देत घरी जाण्यापासून अडवणूक केल्याचे कैलास यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने दोन्ही पोलिस ठाण्यात आणले. कैलास यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर