ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

जमीन खरेदी गुंतवणुकीचा आर्थिक परतावा पडला महाग, व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक, पुण्यातील घटना

12 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे : कात्रज परिसरात जमीन खरेदीत गुंतवणूक केल्यास दरमहा चांगला आर्थिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून नागपूर येथील एका व्यावसायिकासह त्यांच्या परिचितांची तब्बल अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी नागपूरच्या व्यावसायिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात आदित्य भारत गायकवाड (33, रा. सुनीतानगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांची आणि आरोपीची जुलै 2023 मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने कात्रज परिसरात जमीन खरेदीमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव तक्रारदारांसमोर ठेवला.

या गुंतवणुकीत मोठा आणि दरमहा निश्चित आर्थिक परतावा मिळेल, असे सांगून आरोपीने तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. आरोपीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदार आणि त्यांच्या काही परिचितांनी एकूण अडीच कोटी रुपये गुंतविले. सुरुवातीच्या काळात आरोपीने ठरल्याप्रमाणे काही प्रमाणात आर्थिक परतावा दिल्याने तक्रारदारांचा विश्वास अधिक वाढला.

मात्र, काही कालावधीनंतर आरोपीने परतावा देणे बंद केले. गुंतवलेली मूळ रक्कमही परत न मिळाल्याने तक्रारदारांना संशय आला. त्यानंतर चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तक्रारदाराने आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, शहरात भूखंड विक्रीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. नांदेड सिटी परिसरातील एका भूखंडाच्या विक्रीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 32 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सोमनाथ तानाजी रजपूत आणि गणेश बाबूराव गरूड (दोघे रा. नांदेड सिटी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराला भूखंड विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून तो दाखविण्यात आला. संबंधित भूखंडाचा व्यवहार एक कोटी 40 लाख रुपयांत ठरविण्यात आला होता. व्यवहारातील पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराने 32 लाख रुपये दिले. त्यानंतर भूखंडाच्या विक्री व्यवहाराला मान्यता मिळाल्याचे बनावट पत्रही देण्यात आले. पुढील चौकशीत हे पत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचाही पुढील तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर