ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

कर्तव्यनिष्ठ ठाणेदार उमेश बेसरकर यांचे प्रथम पुण्यस्मरण; वृक्षारोपणातून जपली स्मृती

682 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव, दि. 23 ऑगस्ट : कर्तव्यनिष्ठा, माणुसकी आणि सहकाऱ्यांप्रती असलेल्या आपुलकीमुळे मारेगाव पोलीस दलाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे दिवंगत ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रविवारी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच वृक्षारोपणातून त्यांच्या स्मृतींना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक रवी बोरकुले, पोलीस कर्मचारी अतुल सरोदे, सागर दीपेवार, अभी गोयर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थितांनी दिवंगत बेसरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

“काही माणसं जात नाहीत… ती कायमची मनात राहतात!” या भावनेचा प्रत्यय यावेळी उपस्थितांच्या भावना व्यक्त करताना आला. सरांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्यांचे हास्य, दिलखुलास स्वभाव आणि प्रत्येकाच्या मदतीसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व आजही सहकारी व नागरिकांच्या मनात जिवंत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

उमेश बेसरकर यांचे व्यक्तिमत्त्व उमदे, दिलखुलास आणि कलंदर होते. कोणताही कठीण प्रसंग असो, परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊन धीराने मार्ग काढण्याचे विलक्षण कसब त्यांच्या अंगी होते. प्रश्नाची नेमकी जाण आणि समस्या सोडविण्याची हातोटी यामुळे ते केवळ एक अधिकारी नव्हते, तर सहकाऱ्यांसाठी विश्वासाचा भक्कम आधार होते.

14 जून 2025 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत त्यांनी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये सेवा बजावली. अल्प कार्यकाळातही आपल्या कर्तव्यनिष्ठ व लोकाभिमुख कार्यशैलीने त्यांनी मारेगावच्या पोलीस कुटुंबावर अमिट छाप सोडली.

स्मृतींचे वृक्ष… प्रेरणेची नवी पालवी!
पर्यावरणाविषयीही बेसरकर सर यांना विशेष आस्था होती. त्यांच्या कार्यकाळात मारेगाव पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पुन्हा एकदा पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

आज लावण्यात आलेले हे वृक्ष केवळ पर्यावरणाचे रक्षण करणार नाहीत, तर कर्तव्यनिष्ठ ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या विचारांची, माणुसकीची आणि कार्यनिष्ठेची आठवण भावी पिढ्यांना करून देतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

उमेश बेसरकर सरांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विनम्र आदरांजली! त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची मशाल, माणुसकीची ऊब आणि प्रेरणादायी आठवणी मारेगाव पोलीस कुटुंबाच्या मनात सदैव तेवत राहतील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर