ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

फेसबुकवर मुलीचे अश्लील फोटो अपलोड करणाऱ्या आरोपीस अटक,वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल

92 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई:- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,

एका कॉलेजवयीन मुलीचे अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड करून मुलीची बदनामी केल्याप्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव अनिल लेतू आत्राम वय 28 असे असुन तो मारेगाव तालुक्यातील सुसरी येथील रहिवासी आहे.

वणी तालुक्यातील एका गावातील 22 वर्षीय युवती ही वणी तालुक्यातील एका कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. या युवतीचे मागील दोन वर्षांपासून संशयित आरोपी अनिलसोबत प्रेम संबंध होते.अनिल हा तिच्या नात्यातीलच असल्याने या दोघांचे प्रेम बहरत गेले.अनेकवेळा मारेगाव येथील घोन्सा रोड लगत फॉरेस्ट आफिस जवळ असलेल्या झुडूपामध्ये यांचे शारीरिक संबंध देखील होत होते.

अशातच दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. “”प्रेमाला उपमा नाही “” असे म्हणतात तसे दोघेही वारंवार भेटत होते.दोघांचेही संबंध वाढत गेले.अशातच दोघांपैकी एकाच्या घरचा यांच्या लग्नाला विरोध असल्यामुळे आरोपीने लग्नासाठी नकार दिला.त्यामुळे या युवतीने त्याचा विचार मनातून काढून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

अशातच पीडित युवती तिच्या हॉस्टेलला जात असतांना संशयित आरोपी अनिलने चाकूचा धाक दाखवून महत्वाचे बोलायचे आहे म्हणून तिला त्याच्या पल्सर मोटर सायकलवर बसवून मोहोर्लीच्या जंगलात नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.तसेच विवस्त्र अवस्थेत फोटो काढले. मांग भरून आपले लग्न झाले असे जबरदस्तीने बोलायला लावले आणि या सर्व घटणांचे फोटो शूट केले.

आणि वणी येथील टिळक चौक येथे आणून सोडून संशयित आरोपी निघून गेला.तसेच घरी व्हिडीओ कॉल करून विवस्त्र होण्यास सांगितले. या व्हिडीओचे स्क्रीन शॉट काढून फेसबुकवर स्टोरी ठेऊन व्हायरल केले असून यामुळे माझी बदनामी झाली असा आरोप करीत सदर युवतीने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यावरून मारेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत पोलीस उपनिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत,राजू टेकाम यांनी आरोपीला हैद्राबाद येथून अटक केली असून त्यांचेवर कलम 354, (क )376 (2)(n ) तसेच सहकलम 66(e ) माहिती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.अजय वाभीटकर करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर