ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हटवांजरी येथे जागतिक महिला दिन साजरा….

63 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.



मारेगांव तालुका प्रतिनिधी:-

सुरेश पाचभाई[9922862184]



सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे काल दिनांक 8 मार्च 2022 रोज मंगळवार दुपारी 12 वाजताच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष निताताई कुमरे , सरपंच हटवांजरी,कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ह.भ.प. कु. स्वाती ठेंगणे व प्रमुख पाहुणे म्हणून मडावी सर, जेस्ट समाज सेवक पुंडलिकराव साठे , लहु जिवतोडे, कृषी सहाय्यक विनायक जुमनाके ग्रामसेवक डी.यु.जाधव गावांतील पोलीस पाटील अनिरुद्ध माथनकर , मोघे मॅडम, पाकमोडे मॅडम, हे उपस्थित होते



गावामधे प्रभात फेरी काढण्यात आली येथील हनुमान मंदिरा पासून तर समपूर्ण गावात रॅली फिरण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन नरवडे सर यांनी केले. प्रास्ताविक ग्रामसेवक डी.यु.जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन सौरभ चौधरी यांनी केले. स्वाती ठेंगणे यांनी जिजाऊ आणि सावित्री या विषयावर व्याख्यान दिले. व अभिषेक हेपट यांनी आजचा तरुण आणि आजची आई या विषयावर व्याख्यान दिले. या नंतर सुमारे 4 वाजता या कार्यक्रमाची समाप्ती झाल्याची माहिती ग्रामस्थानी दिली आहे . या कार्यक्रमाच्या वेळी गावातील सर्व महिला व पुरुष, शिक्षकवर्ग,कर्मचारी,आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते….

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर