ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक तहसीलदार निलावाड यांनी पकडला

165 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महसूल विभागाची अवैध रेतीच्या ट्रकवर महादापेठ येथे धडाकेबाज कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव,

बोरी गदाजी मार्गाने रेतीची तस्करी करीत असलेल्या ट्रकवर मारेगाव महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई केली.तालुक्यातील महादापेठ येथे ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


मारेगाव तालुक्याला समृद्ध असा वर्धा नदीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे या वर्धा नदीच्या मार्गाने मोठया प्रमाणावर रेतीची तस्करी होत असते.आजपर्यँत अनेक रेती तस्करांवर कारवाई सुद्धा झाली.परंतु रेतीची अवैध वाहतूक मात्र बंद झालेली नाही.अशातच आज मंगळवारला रात्री 8:16 वाजताच्या सुमारास ट्रक वाहनाने हे गोरखधंदे करीत असल्याने सातत्याने महसूल विभाग त्यांच्या कायम मागावर होते.


आज रात्री तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनात महसूल पथक रेती तस्करांच्या मागावर असतांना रेती भरलेला ट्रक बोरी गदाजी ते करणवाडी कडे मार्गाने रेती भरून येणारा हायवा (MH-36 1675) हे अवैध वाहन महादापेठ येथे पकडण्यात आले. पंचनामा करून दंडात्मक कारवाई साठी ताब्यात घेतलेला ट्रक तहसील कार्यालयात येथे जमा करण्यात आल्याची माहिती आहे. ही कार्यवाही उत्तम निलावाड तहसीलदार मारेगांव,भगत नायब तहसीलदार,रघुनाथ कांडाळकर मंडळ अधिकारी आणि विजय कनाके वाहन चालक यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर