ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

चिंचाळा येथील बोगस बंगाली डॉक्टरवर कारवाई.

152 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुक्यातील बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाची धडाकेबाज कारवाई पोलिसात गुन्हा दाखल.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील बिना डिग्री चे बोगस डॉक्टर हे आरोग्य विभागाच्या रडारवर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. चिंचाळा येथे अवैद्यरित्या प्रॅक्टिस करीत असलेल्या एका बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी मारेगाव यांनी धाड टाकत त्याला रंगे हाथ पकडत पडदाफाश केला. त्यामुळे तालुक्यातील बोगस डाक्टरांचे चांगलेच धाबे दनानले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मारेगाव तालुक्यात या बोगस डॉक्टरांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळण्याचे काम या बोगस डॉक्टरांकडून होत असते. अनेकवेळा यांची पुरेपूर माहिती आरोग्य विभाग तसेच पंचायत समिती यांचेकडे असतांना सुद्धा याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्या गेले. अशातच दिनांक 4 ऑगस्टला 2022 ला चिंचाळा येथे एक बंगाली बोगस डॉक्टर अवैध रित्या प्रॅक्टिस करीत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली.

यावरून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शनात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना देठे यांनी आपले कर्मचारी सोबत घेत चिंचाळा येथे दिनांक 4 ऑगस्टला 2022 रोज गुरुवारला 3 वाजता धाड टाकली. यावेळी प्रणव राधागोविंद मंडल वय 30 वर्षे रा.आसानगर ता. क्रीशनगर, जि. नंदीया, राज्य पश्चीम बंगाल हे अवैधरित्या व्यवसाय करीत असल्याचे आढळून आला. त्यांच्याकडे महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय कायदा 1961 अंतर्गत ऍलीओपॅथी करण्यास परवानगी नाही.

त्यांचेकडे नॅचरोपॅथी आणि योगा हेच 2 वर्षाचा डिप्लोमा प्रमाणपत्र आढळून आले. त्यांना फक्त नॅचरोपॅथी योगा करण्याची परवानगी आहे. त्यांच्याकडे परवानगी नसलेली ऍलोपॅथी औषधी आढळून आली. या विषयीं विचारणा केली असता डॉक्टरनी कोणतेही उत्तर दिले नाही. डॉ.अर्चना देठे यांनी पोलिसांना बोलावून या बोगस डॉक्टरवर कारवाई केली. यावेळी त्यांचे जवळील औषधी जप्त करण्यात आली. सदर बोगस डॉक्टरवर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय कायदा 1961 च्या कलम 33 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर