ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

श्रीकृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण)येथे भव्य यात्रेचे आयोजन.

199 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

यात्रेमध्ये या वर्षी भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.

शंकरपटाचे उद्घाटन अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई [9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्याच्या ठीकाणा पासुन जवळच असलेल्या नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री तुळशी वृंदावन मंदिर आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोज शनिवारला महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे दिनांक 24 फेब्रुवारी 2023 शुक्रवारला दुपारी 1 वाजता गोपाल काला आणि 28 फेब्रुवारी रोज पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती कमिटी कडून प्राप्त झाली आहे.

या वर्षी यात्रेमध्ये शंकरपटाचे भव्य आयोजन कमिटी तर्फे करण्यात आले असुन या शंकरपटाचे उद्घाटन दि.24 फेब्रुवारी 2023 शुक्रवारला अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते करण्यात येणार आहे.तसेच भव्य यात्रेचे आयोजन पण करण्यात आले आहे. परिसरातील भाविककान्हा या यात्रेचा आनंद घेता येणार आहे.

श्री क्षेत्र तुळशी वृंदावन देवस्थान नवरगांव धरण रजिस्टर नंबर ए. 392 द्वारा 24 ते 28 फेब्रुवारी पर्यंत भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नवरगांवच्या बाजूला नृसिंह मंदिर पुरातन [हेमाडपंथी ] असुन असंख्य जुण्या दगडी कोरीव मुर्ती त्या मंदिरात आहे.

त्यास प्रमाणे गावाच्या मध्यभागी महादेवाचे मंदीर असुन गावापासुन सुमारे 1 कि.मी अंतरावर श्री तुळशी वृंदावन देवस्थान आहे या देवस्थानाचा ऊदय सुमारे सन 1949 साली महाशिवरात्री पासुन झाल्याचे सांगीतले जात असुन ही मारेगाव तालुक्यातील श्री ऋषि मुनिची तप भूमी असल्याचे मानले जाते देवस्थान परीसरात तिर्थक्षेत्र विकास निधी मधुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,भव्य सभागृह, बगीच्याचे कंम्पाऊंड, पुर्ण परीसर विद्युतीकरन, प्रशस्त निवास, परीसराला संरक्षण भिंत, ईत्यादी विकास कामे झाले असुन दही हंडी माळा,पाकगृह,व कार्यालय, विश्राम गृहचे पण काम झाले आहे.

या ठीकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जत्रा महोत्सवाचे दिनांक 24 ते 28 फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यात आले असुन 18 फेब्रुवारी रोजी घटस्थापना 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता गोपाल काला व 28 फेब्रुवारी रोजी पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहीती व्यवस्थापन कमेटी व आयोजन समिती श्रीकृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान, नवरगांव (धरण) ता. मारेगांव जि. यवतमाळ र.नं. ए-३९२ यांचे कडून प्राप्त झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर