ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

बंद हायमॅक्स लाईटमुळे अपघातात वाढ.

98 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कडेला असलेल्या दुभाजकाला धडकतात वाहने.

संबंधीत विभागाचे दुर्लक्ष.

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव यवतमाळ रोडवरील करणवाडी जवळ असलेले हायमॅक्स लाईट मागील एक महिन्यापासून बंद आहे. रात्रीच्यावेळी नवीन या परिसरात नव्याने येणारे वाहनधारक यांना रस्त्याचा अंदाज नसल्याने अनेकवेळा वाहने रस्त्याच्या कडेलाच असलेल्या दुभाजकावर धडकत असल्याचे चित्र असून संबंधीत विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसत आहे.

मारेगाव ते यवतमाळ दरम्यान मारेगाव जवळील करणवाडी फाट्याला लागून मोठे हायमॅक्स लाईट लावण्यात आलेले आहे. येथे वाहनधारकांसाठी वाहनतळ असून येथे वाहनधारक विश्रांतीसाठी थांबत असतात.त्यामुळे या ठिकाणी मोठया हायमॅक्स लाईटची व्यवस्था करण्यात आली.परंतु मागील एक महिन्यापासून हे हायमॅक्स लाईट बंद अवस्थेत आहे.

त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याला लागून असलेल्या दुभाजकावर जाऊन वाहने आदळतात आणि अपघात घडतात.या ठिकाणी प्रत्येक आठवड्यामध्ये दोन ते तीन किरकोळ स्वरूपाचे अपघात घडले असल्याचे सांगण्यात येत आहे.परंतु याकडे संबंधीत विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन पाहत असल्याचा आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे.

संबंधीत विभागाला होत असलेल्या अपघाताच्या घटना ह्या बहुतेक कमी वाटत असल्यानेच याकडे डोळेझाक करते की काय अशी शंकाही व्यक्त केल्या जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर