ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बीज प्रक्रिया केल्या शिवाय खरीप पेरणी करू नये.

125 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका कृषी अधिकारी मारेगाव यांचे शेतकऱ्याला आवाहन.

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव:सध्या शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत आहेत.पण बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये,असे आवाहन जे आर राठोड उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा आणि तालुका कृषी अधिकारी मारेगाव विभागाकडून करण्यात आले आहे. सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास मोठे नुकसान होते.

त्यासाठी नंतर फवारणीचा खर्च वाढतो.त्यामुळे बीजप्रक्रिया करताना बुरशी नाशक थिओफेनेट मिथाइल ४५% + पायराक्लोस्ट्रोबिन ५% एफएस, थायोमेक्झाम ३४टक्के एफएस हे कीटकनाशक १०मिली प्रति किलो बियाण्यास लावावे.तसेच सोयाबीनसाठी नत्र स्थिर करण्यास व स्फूरद उपलब्ध करून देण्यासाठी रायझोबियम व पी.एस.बी. हे जैविक घटक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बियाण्यास लावावे. बीजप्रक्रिया म्हणजे एकप्रकारे लसीकरण आहे.

पेरणीवेळी वाफसा, यंत्र, ट्रॅक्टर आदींची जुळवाजुळव तसेच जास्त क्षेत्र असेल, तर गडबड होते.अशा वेळी अनेकजण बीजप्रक्रिया करण्यास टाळाटाळ करतात किंवा केली तरी ती योग्य प्रकारे होत नाही.त्यासाठी रासायनिक बीजप्रक्रिया ही पेरणीच्या आठ दिवस आधीच करून ठेवावी.बीजप्रक्रिया करताना एकेक पोत्याला औषध लावावे.

(जास्त बियाणे घेऊन एकत्र लावले, तर सगळीकडे चांगल्या प्रकारे व बियाण्याला औषध एकसारखे लागत नाही).

औषध मिसळताना हातात प्लॅस्टिक पिशवी घालावी,डोळ्यालागॉगल लावावा,तसेच तोंडाला मास्ककिंवा रुमाल बांधावा,असे आवाहन ही करण्यात आले आहे व जैविक बीजप्रक्रिया पेरणीच्या आधी १ ते २ तास करून बियाणे सावलीत सुकवावे.

तूर पिकाच्या बियाण्याला ‘ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.सोयाबीनसाठी काही संयुक्त औषधे उपलब्ध आहेत यात कीटकनाशक व बुरशीनाशक एकत्र आहे.याचा वापर प्रभावी व परिणामकारक ठरेल, अशी माहिती सुनील निकाळजे तालुका कृषी अधिकारी मारेगाव यांनी दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर