बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Nagpur Bank Robbery case : नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाने बॅकेत शिरून कर्मचाऱ्यांवर मिरची पूड टाकून 4.53 लाख चोरी केल्याची घटना घडली होती. ही संपूर्ण घटना बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली होती. या घटनेच्या जवळपास अर्धातासात आरोपीला गजाआड करण्यात आले होते. या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी हा B.SC ग्रॅज्यूएट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण चोर कसा बनला? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज भोजराज बोरकर (वय 28 रा. मु.तातोली, ता. भिवापूर) हा बीएस्स.सी ग्रॅज्यूएट होता. आणि सध्या तो मेडीकल रिप्रेसेंटेटीव्ह (MR) म्हणून काम करत होता.शेअर मार्केटमध्ये तो पैसे लावायचा. यासाठी त्याने अनेकांकडून कर्ज देखील घेतले होते. तसेच त्याच्यावर बँकेचेही कर्ज होते. त्यामुळे त्याच्यावरील कर्जाचा आकडा हा 5 लाखापर्यंत गेला होता.
दरम्यान कर्जाची रक्कम वाढल्यानंतर बँकेंनेही त्याच्याकडे कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला होता. या गोष्टीला कंटाळून शेवटी त्याने बँक लुटीचा प्लान आखला. प्लाननुसार त्याने दुकानातून मिरची पूड घेतली आणि गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तो भांडेप्लॉट चौकातील, चौधरी रुग्णालयासमोरील सक्कदऱ्यातील स्टेट बँक इंडियाच्या शाखेत शिरला. बँकेत शिरताच त्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकायला सुरूवात केली. त्यानंतर त्याने बँकेतून 4.53 लाख रूपयाची रक्कम लांबवली होती.
#BREAKING A man threw chilli powder at SBI staff in Nagpur, escaping with ₹4.53 lakh. Swift action by @NagpurPolice led to the quick arrest of accused Suraj Borkar and full recovery.
#Nagpur #BankRobbery #NagpurPolice #SBI #CrimeNews pic.twitter.com/PyHqV5Untt
— jarvis ☠️ (@Vishii14) September 11, 2026
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी लगेचच या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी बीट मार्शलच्या मदतीने अवघ्या अर्धातासात त्याला अटक केली. यावेळी त्याच्याकडून 4.53 लाख रूपयाची रक्कम जप्त केली गेली. यानंतर सूरज भोजराज बोरकरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याने कर्जबाजारी झाल्यामुळे बॅक लुटल्याचे सांगितले होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.