ब्रेकिंग न्यूज
गणरायाच्या आगमनाची चाहूल! सिंदी येथे तान्हा पोळ्याचा उत्साह; चिमुकल्यांच्या सहभागाला बक्षिसांची दाद Crime : लग्न झालेले पण ‘ती’ आवडायची, बायकोने रंगेहाथ पकडताच भयानक घडलं, गर्लफ्रेंडसह नवऱ्याने शांत डोक्याने… चिकन, मटणपेक्षा पॉवरफुल अशी भाजी, शेतकऱ्यांनी केली शेती अन् 4 महिन्यात कमावले साडेचार लाख! Thane ATS News | Namira Khanने बनावट पासपोर्टमध्ये दिलेल्या पत्त्यावर नेमकं कोण राहतंय? | Tariq Khan Vaibhav Sooryavanshi : बुमराहने थोडीही दयामाया दाखवली नाही! 5 बॉल यॉर्करवर यॉर्कर अन् वैभव पायाचा अंगठा वाच… Nagpur : शेअर मार्केटमध्ये झाला लॉस, बँक लुटून केला खर्च ‘कव्हर’, B.SC ग्रॅज्युएट तरुण चोर बनला कसा? VIDEO पंढरपूरमधील माजी सैनिकाची किमया, पशुपालनातून मिळवतोय महिन्याला 1 लाख उत्पन्न, सांगितला यशाचा मंत्र, Video Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन
SP News Maregaon

Crime : लग्न झालेले पण ‘ती’ आवडायची, बायकोने रंगेहाथ पकडताच भयानक घडलं, गर्लफ्रेंडसह नवऱ्याने शांत डोक्याने…

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Crime News : बायको बाजारात गेली होती, त्यामुळे तिला घरी यायला खुप उशीर होणार असल्याने नवऱ्याने गर्लफ्रेंडला घरात बोलावून घेतले. खुप वेळ एकमेकांसोबत घालवल्यानंतर अचानक घरात बायको अवतरली. आपल्याच घरात आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली.त्यामुळे ती भांडणावर उतरली आणि इथेच खुप भयानक कांड होऊन बसलं.एका क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं.त्यामुळे नेमकी संपूर्ण घटना काय आहे? हे जाणून घेऊयात.

खरं तर या घटनेतील नवरा लाल बाबू याचे लग्न झाल्यानंतर देखील एका महिलेसोबत अफेअर होते. रुखसार असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव होते. दोघांना लग्न करायचे होते. पण बायको शबीला दोघांच्या रस्त्यातला काटा बनली होती. त्यामुळे कधी एकदा बायकोला संपवतोय आणि नवीन संसार उभा करतोय असं लालबाबूच्या मनात होतं.

घटनेच्या दिवशी शबीला बाजारात जाताच लाल बाबून रुक्सारला घरात बोलावून घेतलं. नवऱ्याला वाटलं तिला खुप उशीर होईल म्हणून त्याने रुक्सारला घरात आणलं. पण काही वेळ उलटल्यानंतर बायको घरात पोहोचली आणि तिने नवऱ्याला गर्लफ्रेंड रुक्सारसोबत रंगेहाथ पकडलं. बायकोने पहिल्यांदाच नवऱ्याला रंगेहाथ पकडल्याने ती पेटून उठली आणि भांडायला लागली.

बायकोला ड्रामा करताना पाहून नवऱ्याची सटकली आणि त्याने गर्लफ्रेंडसोबत मिळवून बायकोला संपवलं. या घटनेची माहिती त्याच्या भावाला लागताच त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. याआधी दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. विशेष म्हणजे दोघांनी पळ काढताना वेगवेगळे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सूरू केला होता.

तपासा दरम्यान पोलिसांना काहीच सुगावा लागत नव्हता त्यामुळे त्यांनी जवळजवळ 300 सीसीटीव्ही तपासले होते. हे सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यांना समजले की रुक्सार या घटनेनंतर फरार झाली होती.पळ काढताना रुक्सारने चेहरा दुपट्ट्याने ढाकला होता, जेणेकरून तिला कुणी ओळखू नये. दुसरीकडे लाल बाबू मुलासह रॅपिडो बाईक करून नोएडाला गेला. तिथे त्याचा चुलत भाऊ राहतो. त्याला भेटल्यानंतर तो गावात गेला आणि त्याने मुलाला आई वडिलांकडे सोडलं आणि तो मुंबईत आला.

त्यानंतर पोलिसांनी नवऱ्याला माग काढत पहिल्यांदा चुलत भावाला उचललं आणि मग नवऱ्याला दिल्लील आल्यावर उचललं. आरोपी नवरा सापडताच पोलिसांना लगचे त्याच्य गर्लफ्रेंडचाही ठावठिकाणा लागला.

पोलिसांनी दोघांनी अटक केल्यानंतर तपासादरम्यान दोघांनी अफेअर असल्याच कबुल केलं.तसेच दोघांना लग्न करायचं होतं म्हणून त्यांनी बायकोची हत्या केली होती. ही घटना दिल्लीत घडली आहे. या घटनने एकच खळबळ माजली आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर