ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

युवकाच्या मृतदेहाने तालुक्यात खळबळ

122 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

 हत्या की आत्महत्या परिसरात चर्चांना उधान

 नवरगाव येथील धरणाजवळ आढळला मृतदेह

 सुरेश पाचभाई विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,

तालुक्यातील नवरगाव धरणाजवळ आज दिनांक २७ मार्च २०२४ रोज बुधवारला सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह आढळून आल्याने मारेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाशेजारी विषारी कीटकनाशकाची बॉटल आढळून आल्याने  ही हत्या की आत्महत्या याची चर्चा मात्र तालुक्यात सुरू आहे.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरण हे पर्यटन प्रेमींयुगुलासाठी एक महत्त्वाचे स्थळ आहे.येथे अनेक प्रेमवीर आपली प्रेमाची भूक भागवण्यासाठी या ठिकानी येत असतात.येथे प्रेमयिगुलांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.अशातच आज एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडालेली आहे.

हा युवक वणी तालुक्यातील रासा येथील असून त्याचे नाव प्रज्योत भिमराव मुन वय अंदाजे 22 असे आहे.तो वणी येथे iti मध्ये   शिक्षण घेत होता अशी माहिती असून

प्रज्योतचे वडील बांधकाम ठेकेदारीचे काम करत असून त्याला दोन बहिणी आहेत.त्यापैकी एका बहिणीचे लग्न झाले असून दुसरी बहीण एका कॉन्व्हेंट वर शिक्षिका म्हणून शिकवत आहेत. प्रज्योत हा एका मेडिकल स्टोर्सवर काम करायचा अशी माहिती आहे.

त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली हे अजून कळले नसले तरी त्याच्या मृतदेहाशेजारी विषारी कीटक नाशकाची बॉटल आढळून आल्याने ही आत्महत्या की हत्या? अशी चर्चा मात्र तालुक्यात रंगत आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठवण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर