ब्रेकिंग न्यूज
Thane ATS News | Namira Khanने बनावट पासपोर्टमध्ये दिलेल्या पत्त्यावर नेमकं कोण राहतंय? | Tariq Khan Vaibhav Sooryavanshi : बुमराहने थोडीही दयामाया दाखवली नाही! 5 बॉल यॉर्करवर यॉर्कर अन् वैभव पायाचा अंगठा वाच… Nagpur : शेअर मार्केटमध्ये झाला लॉस, बँक लुटून केला खर्च ‘कव्हर’, B.SC ग्रॅज्युएट तरुण चोर बनला कसा? VIDEO पंढरपूरमधील माजी सैनिकाची किमया, पशुपालनातून मिळवतोय महिन्याला 1 लाख उत्पन्न, सांगितला यशाचा मंत्र, Video Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला
SP News Maregaon

Vaibhav Sooryavanshi : बुमराहने थोडीही दयामाया दाखवली नाही! 5 बॉल यॉर्करवर यॉर्कर अन् वैभव पायाचा अंगठा वाच…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Vaibhav Sooryavanshi in Net practice Session : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-ट्वेंटी मॅचेसची सिरीज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता दोन्ही टीम्स सराव करत असून टीम इंडिया सिरीज जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. अशातच टीम इंडियासाठी आनंदाची बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह याचं कमबॅक झालं असून तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना दिसेल. तर याच सिरीजमध्ये वैभव सूर्यवंशी देखील खेळणार आहे. अशातच नेट सेशनमध्ये दोन्ही खेळाडू आमने सामने आले, तेव्हा काय घडलं? त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
वैभव अंगठा वाचवण्याच्या प्रयत्नात
सिरीजपूर्वी बुमराह पुन्हा एकदा पूर्ण रिदममध्ये बॉलिंग करताना दिसला. त्याने नेट्समध्ये 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला आपल्या वेगाने आणि अचूक लाईन-लेंथने चांगलंच चाचपडलं. त्यामुळे वैभव यावेळी फक्त आपला अंगठा वाचवण्याच्या प्रयत्नात होता, असं दिसून आलं.

पहिला बॉल: बुमराहने गुड लेंथवर बॉल टाकला. वैभवने त्यावर बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, पण बॉल बॅटला न लागता थेट निघून गेला आणि वैभव पूर्णपणे बीट झाला.

दुसरा बॉल: बुमराहने पुन्हा त्याच गुड लेंथवर बॉल टाकला. या बॉलचा वेग इतका जास्त होता की वैभवची बॅट खाली येण्यापूर्वीच बॉल वेगाने बॅटच्या शेजारून निघून गेला.

तिसरा बॉल: बुमराहने एक परफेक्ट यॉर्कर बॉल टाकला. वैभवने अत्यंत प्रयत्नाने तो बॉल कसाबसा खाली दाबून काढला आणि बोल्ड होण्यापासून स्वतःला वाचवलं.

चौथा बॉल: बुमराहने थोडा बॅक ऑफ लेंथ (शॉर्ट-पिचच्या जवळ) बॉल टाकला. वैभवने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल त्याच्या बॅटची बाहेरची कड घेऊन मागे गेला.

पाचवा बॉल: बुमराहने थोडा ओव्हर-पिच (पुढे टाकलेला) बॉल टाकला. या बॉलवर वैभव सूर्यवंशीने अप्रतिम कव्हर ड्राईव्ह मारून बॉल सीमारेषेकडे पाठवला.

Jasprit Bumrah vs Vaibhav Sooryavanshi. What happened next? pic.twitter.com/Ep6igaQUnf
— Tanuj Lakhina (@tanujlakhina) September 11, 2026

दरम्यान, मागच्या वेळी जेव्हा सूर्यवंशीला पहिल्यांदा संघात स्थान मिळाले होते, तेव्हा बुमराह यूकेमधील टी-ट्वेंटी संघात नव्हता आणि तो एकदिवसीय सामन्यांसाठी संघात सामील झाला होता. त्यामुळे बुमराह आणि वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच नेट प्रॅक्टिसमध्ये आमने सामने आहे अन् बुमराहाने इंटरनॅशनल क्रिकेट म्हणजे काय असतं? याची झलक दाखवली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर