ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

राज्य महामार्गावरील बुरांडा पुलावर ४५ वर्षीय व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

1.9k Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आत्महत्येचा प्राथमिक अंदाज; कारण अद्याप अस्पष्ट

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथील मारोती देवराव कामटकर (वय अंदाजे ४५) यांचा राज्य महामार्गावरील बुरांडा पुलावर गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, ही आत्महत्येची घटना असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, सर्व बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मारोती कामटकर यांच्या पश्चात एक मुलगी व एक विवाहित बहीण असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने बुरांडा गावासह परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर