ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

केगांव येथील शेतकऱ्यांची कीटनाशक प्राशन करून आत्महत्या तर दुसऱ्याचा पाण्यात पडल्याने मृत्यू.

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही. तालुक्यात काही काळाच्या विश्रांती नंतर पुन्हा आत्महत्येने डोके वर काढल्याचे दिसुन येते आहे.

नरसाळा येथे आज दिनांक 6 ऑक्टोंबर 2022 रोज गुरुवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास नरसाळा येथील एका मुर्माच्या खदान जवडील खड्यातील पाण्यामध्ये मृतदेह तरंगत असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास येताच घटणा उघडकीस आली.दिलीप देविदास रामपुरे वय सुमारे 21 वर्ष रा.गोंडबुरांडा असे मृतकाचे नाव असुन हा घरून दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 रोजी सांयकाळी 5 वाजताच्या सुमारास करंजी येथे नातेवाईकांकडे जातो असे सांगुन घरुन गेला होता.नरसाळा येथील मुरमाच्या खड्ड्यातील पाण्यामध्ये मृत्यू अवस्थे मध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही.

तर दुसऱ्या घटनेमध्ये स्वप्नील राजु पाचभाई वय सुमारे 24 वर्ष रा.केगाव असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव असुन तो दिनांक 5 ऑक्टोंबर 2022 रोज बुधवारला देव्या पाहण्याकरीता जातो अशे घरी सांगुन घरुन गेला होता.परंतु तो रात्री घरी परत आला नाही. त्याने शेतामध्ये जाऊन विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 6 ऑक्टोंबर 2022 रोज गुरुवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्याचे वडील शेतात जाताच ही घटना उघडकीस आली.त्याच्या वडीलांच्या नावाने केगाव येथे 3 एकर शेती आहे.मृतक स्वप्नील यांच्या पश्चात आई,वडील असा आप्त परिवार आहे. या दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.







ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर