बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Gym Trainer Murder CCTV Footage : गेल्या काही वर्षात महाराष्ट्रासह भारतात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. खून, मारामारी अन् अत्याचाराच्या घटनेत दुपटीने वाढ झाली असताना आता दिल्लीतून हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी भर चौकात एका जिम ट्रेनरची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. विजय कुमार असं या जिम ट्रेनरचं नाव असून त्याच्यावर तब्बल 15 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळी 10:30 वाजता हत्या
पोलिसांनी घटनास्थळावरून 18 रिकाम्या काडतुसे आणि एक काडतूस जप्त केले आहे. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, हत्येच्या आरोपाखाली दीपकसोबत तुरुंगात असलेल्या योगेशचा मोठा भाऊ विजय कुमार याची फतेहपूरबेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आया नगर येथील परफेक्ट जिमच्या बाहेर सकाळी 10:30 वाजता हत्या करण्यात आली. या हत्याकांडप्रकरणी सोशल मीडियावर हिमांशू भाऊच्या नावाने एक पोस्ट आली आहे.
पळून काही होणार नाही…
हिमांशू भाऊ गँगने हत्येची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. पोस्टमध्ये हिंदीत इशारा देण्यात आला आहे. पळून काही होणार नाही, मैदानात या. कोणालाही पळून जाऊ देणार नाही, असं इशारा या पोस्टमध्ये देण्यात आलाय. पोस्टमध्ये “भाऊ गँग” आणि Since-2020… असं लिहिलं आहे. या प्रकरणात सध्या ‘भाऊ टोळीच्या शार्प शूटरला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Jalgoan Crime : घरात गणपती स्थापनेची धामधूम अन् खोलीत जाऊन विवाहितेने मृत्यूला कवटाळलं! 4 वर्षाच्या चिमुकल्यासह संपवलं आयुष्य
हल्लेखोरांपैकी दोघे बाईकवर बसले अन्…
विजयवर हल्ला करणाऱ्यांना माहीत होतं की, जिमजवळ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यांची ओळख लपवण्यासाठी त्यांनी एका मुलाच्या मदतीने विजयला जिममधून बाहेर बोलावले. चार हल्लेखोरांपैकी दोघे बाईकवर बसले होते, तर दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. पोलीस आता या जुन्या हत्याकांडात आणि सोमवारच्या घटनेतील दुवे शोधत आहेत.
दोन डझनांहून अधिक गोळ्या झाडून हत्या
दोन वर्षांपूर्वी विजयचा धाकटा भाऊ अजयचा मित्र दीपक याने अरुण नावाच्या एका तरुणाची हत्या केली होती. या प्रकरणात दीपक व्यतिरिक्त अजय आणि योगेश नामक एका तरुणालाही दोषी ठरवण्यात आलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सीडीआर चौकात अरुणची दोन डझनांहून अधिक गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, तेव्हा या टोळीयुद्धाला सुरुवात झाली.