ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

रोहित पवारांच्या घातपाताच्या शक्यतेमागे नेमके तर्क काय?:केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांवरील संशयाच्या कारणासह त्यांनी जमा केलेल्या पुराव्यांची A टू Z माहिती वाचा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सादरीकरण करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. विमानाची वेळ का बदलली, पायलट का बदलले गेले, विमानाच्या देखभालीची स्थिती काय होती आणि सर्व चित्रफीत नोंदींची सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. VSR कंपनी सर्व नियमांचे उल्लंघन करून विमाने उडवत असल्याचा आरोप करत त्यांनी कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन सर्व विमाने जप्त करावीत आणि कंपनीवर तात्काळ बंदी घालावी, असे म्हटले. DGCA कडून या बेकायदेशीर कृत्यांना अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याची शक्यता व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पवारांनी केली. केंद्रीय मंत्रालय आणि DGCA या दोन्ही संस्था VSR ला मदत करत असल्याने पारदर्शक चौकशीवर प्रश्नचिन्ह असल्याचे ते म्हणाले. माजी अधिकारी, माजी न्यायाधीश, राज्य व लोकसभेतील विरोधी पक्षनेते, कुटुंबीय आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, तसेच सीबीआय तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. 2004 चे सरकारी Citation XLS विमान पडून असून ARROW ला पैसे का दिले जातात, तसेच मोहित शर्मा आणि कॅप्टन दळवी लक्ष का देत नाहीत, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. रोहित पवार यांनी दिलेले प्रेझेंटेशन जसेच्या तसे…. या कारणांमुळेच तर कंपनीवर कारवाई करण्यास विलंब होतोय का? कारवाईस विलंब करून कंपनी मालकाला देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली जातेय का?…..या प्रश्नांची उत्तरे यंत्रणांनी द्यावीत. रोहित पवार यांच्या प्रमुख मागण्या :

१) विमानाची वेळ का बदलली ? पायलट का बदलले गेले? विमानाचा maintenance ? सर्व cctv फुटेज याची विस्तृत चौकशी करण्याची गरज. २) VSR कंपनी सर्व कायद्यांचे उल्लघन करून विमाने उडवत आहे, या कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन सर्व विमाने ताब्यात घ्यावीत, कंपनीवर तत्काळ बंदी घालावी … ३) DGCA कडून VSR करत असलेल्या बेकायदेशीर कृत्यांना अप्रत्यक्ष समर्थन दिले जात आहे.. DGCA आणि VSR यांची मिलीभगत असल्याची दाट शक्यता…. DGCA च्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. ४) Who Is Shweta Singh? ५) केंद्रीय विमान उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची भूमिका देखील VSR कडे झुकणारी असून केंद्रीय मंत्री पारदर्शक चौकशी होऊ देतील यात शंका आहे, त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्यांचा देखील राजीनामा घ्यावा. ६) चौकशी समिती – केंद्रीय विमान मंत्रालय तसेच DGCA या दोन्ही संस्था VSR ला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या कृती करत आहेत. त्यामुळे या अपघाताची पारदर्शक चौकशी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. आमची मागणी – माजी अधिकारी, माजी न्यायाधीश, राज्याचे विरोधीपक्ष नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, कुटुंबातील सदस्य यांच्यासह काही तज्ञांच्या समितीच्या निरीक्षणात चौकशी व्हावी. VIP प्रवास माजी अधिकारी कर्वे साहेब स्वतः जाऊन माहिती घ्यायचे. सध्याचे मोहित शर्मा, कॅप्टन दळवी स्वतः लक्ष घालत नाहीत का? CBI चौकशी सरकारी विमान 2004 Citation XLS पडून आहे, ARROW ला फुकटचे पैसे का ?

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर