ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

सायबर फ्रॉड कॉल सेंटर; 35 खाती:198 सिमकार्ड अन् सहा कोटींचा घोटाळा उघड, चार महिन्यांपासून गोव्यात सेंटर सुरु, नेमणूकीपूर्वी दिले जाते प्रशिक्षण‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मोर्शी तालुक्यातील काटपूर येथील एका गरजू व्यक्तीला सात हजार रुपये देऊन त्याच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यात आले. त्यानंतर त्याच गावातील आणखी सात जणांची बँक खाती उघडून घेण्यात आली. ही खाती उघडून घेणारा व्यक्ती अमरावती येथील राकेशकुमार झामणानी असल्याचे तपासात समोर आले असून तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान याच गुन्ह्याच्या तपासात ग्रामीण पोलिसांच्या सायबर पथकाने थेट गोवा गाठत तेथे अनधिकृतरीत्या सुरू असलेले सायबर फसवणुकीचे कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. तपासादरम्यान या कॉल सेंटरवर काम करणाऱ्या व्यक्तींना कामापूर्वी सायबर फसवणुकीचे विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मागील चार महिन्यांपासून गोव्यातील विविध ठिकाणी हे कॉल सेंटर सुरू असल्याचेही तपासातून निष्पन्न झाले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये राकेशकुमार झामणानी काटपूर येथे गेला होता. त्याने गावातील काही नागरिकांची बँक खाती उघडून घेतली. त्याबदल्यात त्यांना किरकोळ रक्कम देण्यात आली. मात्र संबंधित खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड तसेच बँकेत नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकांचे सिमकार्ड त्याने स्वतःच्या ताब्यात घेतले. एकूण ३५ नागरिकांची बँक खाती उघडून घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. उर्वरित,पान.४ मिळालेल्या पैशांची आर्थिक उलाढाल करुन रक्कम जमा या प्रकरणी पोलिसांनी आवाहन केल्यानंतर आणखी काही नागरिक पुढे आले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील अनेक व्यक्तींची बँक खाती या टोळीमार्फत उघडून घेण्यात आल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नागरिकांची सायबर फसवणूक करून मिळालेल्या पैशांची आर्थिक उलाढाल करण्यासाठी केला जात होता.आतापर्यंत पोलिसांनी ६४ खात्यांमधून ६.२६ कोटी रुपयांचे आर्थीक व्यवहार या कॉल सेंटरच्या माध्यमातून झाल्याचे समोर आणले आहे. दुसऱ्याचे व्हॉट्सॲप वापरुन सर्वांना कॉल केले जायचे या टोळीतील सदस्य एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी प्रामुख्याने व्हॉट्सॲप कॉलचा वापर करीत होते. विशेष म्हणजे वापरले जाणारे व्हॉट्सॲप क्रमांकही इतरांच्या नावावर असत. कारण बँक खाते उघडल्यानंतर त्या खात्याशी संबंधित सिमकार्ड आणि संपूर्ण ॲक्सेस आरोपी स्वतःकडे ठेवत होते. त्यामुळे कोणत्याही क्रमांकावरून व्हॉट्सॲप सुरू करून त्याचा वापर करणे त्यांना शक्य होत होते. क्रमांक इतरांच्या नावावर असल्याने पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणे कठीण होते. आंतरराष्ट्रीय लिंकचा तपास सुरू; मोठे मासे गळाला या सायबर गुन्हेगारांनी देशभरातील अनेक नागरिकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची रक्कम उकळल्याचा संशय आहे. या रकमेपैकी मोठा हिस्सा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात आला असण्याची शक्यता आहे. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ही रक्कम परदेशात हस्तांतरित झाली आहे का आणि त्यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कदम यांनी दिली. सर्व सुविधा मोफत आणि वेळेत उपलब्ध करून दिल्या दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत बारा आरोपींकडून ६४ पासबूक, १४७ एटीएम कार्ड, १९ चेकबुक, १९८ सिमकार्ड, ५२ मोबाईल हँडसेट, ९ लॅपटॉप आणि ३ टॅबलेट जप्त करण्यात आले आहेत, ज्यांची एकूण किंमत १० लाख ८५ हजार रुपये आहे. या कॉल सेंटरवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दरमहा २५ ते ३० हजार रुपये वेतन दिले जात होते. याशिवाय इतर सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जात होत्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर