ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भोंदू अशोक खरातला कॅप्टन म्हणू नका:संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन; अशोक खरातकडे यायच्या उच्चशिक्षित महिला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातला कॅप्टन म्हणू नका, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. अशोक खरात हा देशाच्या सैन्य दलात किंवा नौदलात नव्हता. त्यामुळे त्याच्या नावापुढे कॅप्टन लावू नका, असे ते म्हणालेत. अशोक खरात हा सध्या महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खात आहे. त्याने 100 हून अधिक महिलांना भीती दाखवून, धमक्या देऊन अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच्या या दुष्कृत्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत. त्यामुळे त्याचा कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा भोंदूबाबा आपण नौदलातील कॅप्टन असल्याचे सांगायचा. पण संभाजीराजे छत्रपती यांनी हा व्यक्ती सैन्यदल किंवा नौदलात कॅप्टन नव्हता, त्यामुळे त्याला कॅप्टन म्हणण्याची काहीही गरज नाही असे ठणकावून सांगितले आहे. काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? संभाजीराजे छत्रपती यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कॅप्टन” हे भारतीय लष्करातील अत्यंत सन्मानाचे पद आहे. या पदापर्यंत पोहोचणारा व्यक्ती अतिशय मेहनतीने, जिद्दीने व प्रखर राष्ट्रभक्तीने इथेपर्यंत पोहोचत असतो. भारतीय सेनादलांत या पदावर सेवा बजावणाऱ्या किंवा या पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तींनाचा नावासोबत “कॅप्टन” हे पद जोडण्याचा अधिकार असतो. सर्व जनतेला आणि विशेषत: माध्यमांना माझी विनंती आहे की, घृणास्पद कृत्ये करणाऱ्या भोंदूच्या नावापुढे कुठेही हे पद लावू नये. हा भोंदूबाबा कधीही आपल्या सैन्यदलात अथवा नौदलात नव्हता. कधीकाळी व्यावसायिक व्यापारी जहाजांवर कर्मचारी असलेला हा व्यक्ती स्वयंघोषित कॅप्टन आहे. त्याने स्वतःला लावून घेतलेली खोटी पदवी आपण संमत करून नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान करू नये, असे ते म्हणालेत. अशोक खरातकडे उच्चशिक्षित महिला यायच्या दुसरीकडे, भोंदू अशोक खरातकडे उच्चशिक्षित महिला येत असल्याचीही बाब समोर आली आहे. यासंबधी पत्रकार दत्तात्रय खेमनार यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले आहे की, अशोक खरातकडे येणाऱ्या महिला उच्चशिक्षित, सरकारी अधिकारी व राजकीय कुटुंबातील होत्या. तो या महिलांना म्हणायचा की मी देव आहे. तुझे आयुष्य चांगले करायचे असेल तर मला तुझे योनी शुद्धीकरण करावे लागेल. त्यासाठी तो त्या महिलेला स्वतःची लघवी प्यायला लावायचा. एका व्यावसायिकाला व्यवसायात तोटा झाल्यानंतर तो मार्गदर्शनासाठी अशोक खरातकडे आला होता. त्याला खरातने खोटी रत्ने देऊन फसवले. त्याला प्रथम साडेतीन लाख रुपयांना एक रत्न विकले. त्यानंतर दुसरे रत्न दोन लाखांना विकले. पण ही दोन्ही रत्ने खोटी निघाली. हा व्यक्ती त्याच्याकडे येणाऱ्या स्त्री – पुरुषांनाही एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा. खरातने एका बड्या उद्योजकाचे सूत दुसऱ्या एका महिलेशी जुळवू दिले. त्यानंतर ही महिला गरोदर राहिल्याचे खोटे सांगून त्याने त्या उद्योजकाकडून तब्बल 20 कोटी उकळले, असे खेमनार यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर