ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

रोजगार संधीचा सुवर्ण मेळावा, 500 पदांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट भरती, जागेवरच मिळणार ऑफर लेटर‎

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‎छत्रपती संभाजीनगर : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी सुवर्णसंधी आहे. एकाच ठिकाणी विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी आता उपलब्ध होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये गुरुवारी अर्थात, 30 जुलै रोजी N-5 कम्युनिटी सेंटर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या मेळाव्यात 500 हून अधिक रिक्त पदांसाठी थेट भरती आहे. पात्र उमेदवारांना इंटरव्यू नंतर त्याच दिवशी ऑफर लेटरही दिले जाणार आहे.

लाईटहाऊस हे युवकांसाठी कौशल्य विकासाचे केंद्र असून गेल्या पाच वर्षांपासून युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. या रोजगार मेळाव्यात बॅक ऑफिस, डेटा एन्ट्री, टेलिकॉलिंग, एचआर एक्झिक्युटिव्ह, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, BFSI (बँकिंग) आणि आयटी क्षेत्रातील विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. डिप्लोमा, आयटीआय, अभियांत्रिकी तसेच पदवीधर उमेदवारांसाठी या मेळाव्यात खूप संधी उपलब्ध आहेत.

‎उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे. त्यानुसार त्यांना दरमहा 25 हजार किंवा त्यापेक्षा अधिक पगार मिळू शकते. विशेष म्हणजे, निवड झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी ऑफर लेटरही देण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार मेळाव्यामध्ये इंटरव्यू देऊ शकता आणि तुमच्या पात्रतेनुसार नक्कीच तुम्हाला या ठिकाणी लवकर देखील लागू शकते. जास्तीत जास्त उमेदवारांनी यावे, असे देखील आवाहन यावेळी स्मार्ट सिटी आणि लाईट हाऊस कडून करण्यात आलेले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर