ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

MPSC साठी हीच ती वेळ! 5707 पदांसाठी मेगा भरती, तलाठी पदाचाही समावेश, अर्जाची शेवटची तारीख कधी?

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या नवीन शुद्धीपत्रकानुसार, या परीक्षेत महसूल व वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या पदाच्या तब्बल 1 हजार 539 जागांचा नवीन समावेश करण्यात आला आहे. यामुळे भरती प्रक्रियेतील एकूण पदांची संख्या आता थेट 5 हजार 707 वर पोहोचली आहे.

एमपीएससीने 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या मूळ जाहिरात 2 हजार 619 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. मात्र, सामान्य प्रशासन विभागाच्या 5 मे 2026 च्या शासन निर्णयानुसार आणि विविध शासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या नवीन मागणीपत्रांनुसार, आयोगाने आता अतिरिक्त 3 हजार 88 पदांचा या परीक्षेत समावेश केला आहे. यामुळे एकूण पदसंख्या 2 हजार 619 वरून वाढून 5 हजार 707 एवढी झाली आहे. ज्या नवीन पदांचा या भरतीत समावेश झाला आहे त्यामध्ये तलाठीचे पदेही आहेत.

कोणती पदे भरण्यात येणार

एमपीएससीच्या नवीन शुद्धिपत्रकानुसार गट क संयुक्त परीक्षेत खालील पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)- (महसूल व वन विभाग) – 1 हजार 539 पदे
वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल – (राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व इतर) – 11 पदे
सहायक अधीक्षक – (कृषि व पदुम विभाग) – 11 पदे
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) – 254 पदे
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय – 230 पदे
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग – 155 पदे
लिपिक-टंकलेखक – (महसूल व वन विभाग) – 480 पदे
लिपिक-टंकलेखक – (नोंदणी व मुद्रांक विभाग) – 339 पदे

पात्रता काय? 

यात ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल आणि सहायक अधीक्षक या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. तर सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) या पदासाठी मत्स्यविज्ञान विषयातील B.F.Sc. पदवी आवश्यक आहे. उर्वरीत 1 हजार 273 लिपिक टंकलेखक पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीसोबत टंकलेखन अहर्ता आवश्यक आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या शुद्धिपत्रक जाहिरातीनुसार, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. यासोबतच गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची अर्ज करण्याची तारीखही वाढविण्यात आली आहे. तुम्ही MPSC च्या https://mpsc.gov.in/home या लिंकवर अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची तारीख काय?

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 5 ऑगस्ट 2026 (रात्री 23:59 वाजेपर्यंत)

ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 08 ऑगस्ट 2026 (रात्री 23:59 वाजेपर्यंत)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर