ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श!

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

घोगुलदरात बांबू, केसर आंबा आणि आंतरपिकांचा अभिनव प्रयोग; जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केली शेतीची पाहणी

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारण आणि पीक विविधीकरणाच्या माध्यमातून शेती अधिक शाश्वत व उत्पन्नक्षम करण्याचा प्रेरणादायी प्रयोग घोगुलदरा येथील शेतकरी कैलास डोंगरकर यांनी साकारला आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीतील उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून त्यांनी बांबू लागवड, केसर आंबा आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यांच्या या अभिनव शेती प्रयोगाची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेताला भेट देऊन पाहणी केली.

नाल्यावर बंधारा बांधून पाणी अडविले
शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात घेऊन कैलास डोंगरकर यांनी शेतातील नाल्यावर बंधारा बांधून पाणी साठविण्याची व्यवस्था केली आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा शेतीसाठी प्रभावी वापर केला जात आहे. पाण्याची टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीतही जलसंधारणाच्या माध्यमातून शेती टिकविण्याचा त्यांचा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.
एक एकरात बांबू, दोन एकरांत केसर आंबा
पारंपरिक शेतीला पर्याय देत उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने डोंगरकर यांनी एक एकर क्षेत्रात बांबूची लागवड केली आहे. यासोबतच दोन एकर क्षेत्रात केसर आंब्याची बाग उभारली असून, त्यामध्ये तूर आणि कापूस या पिकांचे आंतरपीक घेतले आहे. फळबागेसोबत आंतरपिकांची सांगड घालून उपलब्ध जमिनीचा अधिक परिणामकारक वापर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
जलसंधारण, बांबू लागवड, फळबाग आणि आंतरपीक पद्धती यांचा समन्वय साधणारा हा प्रयोग शेतीकडे पाहण्याची नवी दिशा देणारा आहे. पाण्याचे काटेकोर नियोजन आणि पीक विविधीकरणाच्या माध्यमातून शेतीतील जोखीम कमी करण्याबरोबरच उत्पन्नाचे पर्यायी मार्ग निर्माण करण्याची संधी यातून उपलब्ध होते.
शेतकऱ्यांनी प्रयोगाचा अभ्यास करावा
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कैलास डोंगरकर यांच्या शेताला भेट देऊन जलसंधारण व पीक पद्धतीची माहिती घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अशा नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती घ्यावी, जलसंधारणाला प्राधान्य द्यावे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेती अधिक शाश्वत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. घोगुलदरा येथील या शेती मॉडेलला भेट देऊन त्याचा अभ्यास करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जलसंधारणातून समृद्ध शेतीचा संदेश
शेतीसमोर पाण्याची अनिश्चितता, हवामानातील बदल आणि वाढत्या खर्चाची आव्हाने असताना कैलास डोंगरकर यांनी स्वीकारलेली जलसंधारण व पीक विविधीकरणाची वाट महत्त्वपूर्ण ठरत आहे. केवळ पावसावर अवलंबून न राहता पाणी अडविणे, त्याचा योग्य वापर करणे आणि विविध पिकांची सांगड घालणे, या बाबी शाश्वत शेतीसाठी उपयुक्त ठरू शकतात.घोगुलदरा येथील हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देणारा आणि शेतीत नावीन्यपूर्ण बदल स्वीकारण्याची प्रेरणा देणारा ठरत आहे.यावेळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय अधिकारी यतीन पाटील, तहसीलदार उत्तम निलावाड, राठोड, दीपाली खवले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर