ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

एक रुपयात मिळणार पिक विमा.

93 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अॅपव्दारे पिकांच्या नोंदी सातबारावर करण्यांचे आवाहन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी शेतक-यांना आता केवळ एक रुपयात पिकविमा मिळणार आहे.उर्वरीत रक्कम आता राज्यसरकार भरणार असल्याचे अमोल आमले तालुका कृषि अधीकारी झरी जा. यांनी सांगितले आहे हया योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी यांनी इधिक अॅपव्दारे आपल्या पिकांच्या नोदी सातबारा उतारावरती करणे आवश्यक असल्याने सदर नोंदी लवकरात लवकर करण्यांचे आवाहन कु.मेघना कावाली (भा.प्र.से.) प्र. तहसीलदार झरी जामणी यांनी केले आहे.

राज्यातील शेतकरी यांना आता केवळ 1 रुपयांत पिकविमा मिळणार आहे. याची उर्वरीत रक्कमेचा हप्ता आता राज्य सरकार भरणार आहे.राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतीवृष्टी हयामुळे शेतकरी यांच्या पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होते.त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतुन शेतकरी यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी हा योजने मागचा हेतु आहे.
या साठी आवश्यक कागदपत्रे ७/१२ उतारा, बैंक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड, पिक पेरणीचे स्वयंघोषणापत्र

योजनेत सहभाग कसा घ्यावा प्राथमिक सहकारी सेवा सोसायटी, नजीकची बैंक शाखा, सामुहिक सुविधा केंद्र (csc),
विमा मध्यस्थ स्वतः शेतकरी ऑनलाइन पोर्टल द्वारे pmfby.gov.in द्वारे सहभागी होऊ शकतात.सामुहिक सुविधा केंद्र धारकास शासनाकडून पिक विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रु ४०/- अदा करण्यात येतात,त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

प्रधानमंत्री पीकवीमा योजनेअंतर्गत शेतकरी यांनी भरवपाचाविमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवला आहे.या योजनेअंतर्गत सदरचा शेतकरीहिस्सा हयाचा भारसुध्दा शेतक-यांवर न ठेवता शेतक-यांच्याहिस्सा यांची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येईल.त्यामुळे सन 2023-24 पासून शेतकरी यांनी केवळ 1 रुपये भरूनपिकवीमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.

आणी प्रधानमंत्री पीकवीमा योजने अंतर्गतनिश्चीत करण्यात आलेली शेतकरी हिस्सेची पीकनीहाय प्रती हेक्टरी वीमा हप्ता रक्कम व शेतकरी यांनी प्रत्यक्षात भरण्याचा वीमा हप्ता रक्कम 1 रुपये वजा जाता उर्वरीत फरकाची रक्कम राज्यहीस्सा अनुदान म्हणुन राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल.तरी योजनेत सहभागी होण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२३ असुन झरी जामणी तालुक्यातील जास्तीतजास्त शेतकरी यांनी पीकवीमा योजनेत सहभागी होणे बाबत आवाहन अमोल आमले तालुका कृषि अधीकारी झरी जामणी यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर