ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारामती: तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्या’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल रविवारी ८४.२५ टक्के इतके भरघोस मतदान पार पडले. यानंतर आज, सोमवार (१२ ऑक्टोबर) रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत असून, सोमेश्वरच्या सत्तेची सूत्रे पुढील पाच वर्षांसाठी कोणाच्या हाती जाणार? याचा फैसला काही तासांतच स्पष्ट होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शरद पवार गटाचे युगेंद्र पवार आणि बंडखोर विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलमध्ये ही लढत झाली आहे.

नीरा-बारामती रस्त्यावरील माळेगाव बुद्रुक येथील ‘अजंता मॅजेस्टिक बँक्वेट हॉल’ येथे ही मतमोजणी पार पडत आहे. निवडणुकीतील एकूण ९३ केंद्रांवरील मतपेट्यांमधील मतांची मोजणी केली जाणार असून, या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे ४५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कोणतीही अनचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोमेश्वर कारखान्याची ही निवडणूक केवळ बारामती तालुक्यापुरती मर्यादित न राहता शेजारच्या पुरंदर, खंडाळा आणि फलटण तालुक्यांतील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. सत्ताधारी आणि विरोधी तीन प्रमुख पॅनेलसह अपक्ष उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, सभासद शेतकऱ्यांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर