ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अखेर हटवांजरी पोडाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात.

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

प्रशासनाच्या वतीने चक्का जामच्या एक दिवसा आधी करण्यात आली कामाला सुरूवात.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्यातील हटवांजरी (पोड) येथे जाणाऱ्या शासकीय रस्त्यावर  एका शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी करून जाणुन- बुजुन गेल्या अनेक वर्षापासून रस्ताच्या कामात अळथळा निर्माण केला होता.आदिवासी पोडाचा विकास होऊ नये या दृष्ट हेतुने अळथळा निर्माण केला .असे निवेदन ग्रामस्थानी तहसीलदार पुंडे यांना दिले होते. व चक्का जामचा इशारा दिला होता.

चक्का जाम आंदोलनाच्या एका एक दिवसा आधी रस्ता मोकळा करण्यात आला.
दिनांक 16 मार्च 2022 रोज बुधवारला प्रशासनाच्या वतीने हटवांजरी पोड येथे तहसिलदार पुंडे व त्याचे कर्मचारी,ठाणेदार राजेश पुरी सह मारेगाव पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते , भूमी अभिलेख कार्यालातील कर्मचारी ,सार्वजानिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारीवकऱ्यांच्या वतीने दिनांक 16 मार्च 2022रोज बुधवारला रस्ता मोकळा करण्यात आला आहे.



ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवला होता तो रस्ता मोकळा करून त्या रस्त्यावर जेसीपी च्या साह्याने नाली काढण्याचा कामाला सुरुवात झाली आहे.
हे काम सार्वजानिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांचे कडून  करण्याचा येत असुन या कामा साठी 70 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन कामाला सुरुवात झाली आहे. पोडा पासुन काही अंतरा पर्यंत काम पण झाले आहे. व काम सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

व समंधित विभागा कडून काम लवकरात लवकर करण्यात येईल अशी आशा ग्रामस्थानी व्यक्त केली आहे.
यावेळी राजू पारखी, परशराम ठक, लक्ष्मण आस्वले, संतोष टेकाम, सुरेश आत्राम, प्रमोद मेश्राम  संदीप आत्राम , बापूजी कुमरे,यांचे सह अनेक गावकरी गावकरी आनंद व्यक्त केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर