ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

डॉक्टरची सिनेस्टाईलने लूटमार करणाऱ्या आरोपींच्या लागला शोध.

125 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

*रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून डॉक्टरची केली होती लुट.

*पोलिसांनी 24 तासाच्या आत लावला लुटारुंचा शोध.

सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील नवरगाव येथील डॉक्टर प्रभास रवींद्रनाथ हाजरा(45) हे प्रॅक्टिस करून येत असताना रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून त्यांचे कडून पैसे व दागिने घेऊन पसार झालेल्या लुटारूंना स्थानिक गुन्हे शाखा,मारेगाव पोलिस व अदिलाबाद पोलिसांच्या समन्वयातून शोध लावला असुन अदिलाबाद येथे अटक करण्यात आली.

A doctor was robbed at gunpoint with a revolver-knife.

सविस्तर वृत्त असे की.
डॉक्टर प्रभास रवींद्रनाथ हाजरा (45) हे प्रॅक्टिस करून दिनांक 13 मार्च 2023 रोज सोमवारला सायंकाळी 7:30 वाजता सुमारास नवरगाव येथून मारेगाव येथे आपल्या घरी परत येत असताना राज्य महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ अज्ञात चार लूटारूंनी त्यांची स्कुटी अडवून बंदुकीच्या व चाकूच्या धाकावर त्यांना कारमध्ये कोंबून सोन्याची अंगठी,चेन सह रोख 2.5 लाख असा ऐकुन सुमारे चार लाख रूपये कीमतीचा ऐवज लुटत डॉक्टरांणा वणी पासून काही अंतरावर सोडुन पोबारा केला होता.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सर्वत्र सूचना देऊन नाकेबंदी केली होती.तेलंगणा पोलिसांनी अदिलाबाद येथे नाकाबंदी केली होती त्याच वेळी लुटारूंची गाडी तेथे पोहोचली,पोलिसाचे वाहन दिसताच,हे लुटारू त्या ठिकाणावरून पळ काढला पण त्या गाडीतील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.व तिघेजण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.अटकेतील आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येऊ शकते का,या दृष्टीने मारेगाव पोलिस,अदिलाबाद पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा या तिघांच्या समन्वयातून पसार झालेल्या तिघांना झाशी येथे अटक करण्यात आली.

सध्या हे सर्व आरोपी तेलंगणा राज्यातील अदिलाबाद पोलिसांच्या ताब्यात असून तेथील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून या आरोपींना मारेगाव पोलिस आपल्या ताब्यात घेणार असल्याची माहिती मारेगांव पोलिसांन कडून प्राप्त झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर