ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मारेगावात रामनामाचा जयघोष; आज भव्य शोभायात्रेने दुमदुमणार शहर!

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव नगरी आज अक्षरशः राममय झाली असून प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रामनवमीच्या पावन पर्वावर शहरात भक्ती, उत्साह आणि एकतेचा अद्भुत संगम पाहायला मिळत आहे.

श्रीराम नवमी उत्सव समिती व बजरंग दल मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ४:३० वाजता नगर पंचायतजवळील हनुमान मंदिर येथून या भव्य शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. मार्डी रोड, राष्ट्रीय विद्यालय, पोलीस स्टेशन मार्ग, आंबेडकर चौक आणि बाळासाहेब ठाकरे चौक अशा प्रमुख मार्गांवरून ही शोभायात्रा मार्गक्रमण करत पुन्हा हनुमान मंदिरात समारोपाला येणार आहे.

शहरातील प्रत्येक रस्ता, चौक आणि गल्ली भगव्या ध्वजांनी सजली असून “श्री राम नाम सर्वत्र, सर्व हिंदू एकत्र” या घोषणांनी वातावरण भारावून गेले आहे. शोभायात्रेदरम्यान विविध ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमांचे पूजन, फुलांचा वर्षाव आणि जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.


विशेष म्हणजे, या सोहळ्याला अधिक भव्य करण्यासाठी आकर्षक देखावे, ढोल-ताशांचा गजर आणि युवकांचा उस्फूर्त सहभाग पाहायला मिळणार आहे. संपूर्ण तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी स्थानिक प्रशासनानेही कडक बंदोबस्त ठेवला असून सर्वत्र दक्षता घेतली आहे.
आज मारेगावात फक्त एकच नाद… ‘जय श्रीराम!’

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर