ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव येथे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नामांकित मार्गदर्शकांकडून होणार मार्गदर्शन.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

जनहित कल्याण संघटना मारेगाव,क्रांती युवा संघटना वणी तसेच पुरोगामी पत्रकार संघटना मारेगाव यांचे संयुक्त विद्यमाने मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्र येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 15 ऑगस्टला 2023 रोज मंगळवारला होणाऱ्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

मारेगाव येथे दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.यात तालुक्यातील प्रत्येक शाळेमधील इयत्ता 10 वी तसेच इयत्ता 12 वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांती युवा संघटना वणीचे अध्यक्ष राकेश खुराणा,उदघाटक डॉ.मनिष मस्की,नगराध्यक्ष न.पं.मारेगाव,प्रमुख अतिथीमध्ये गौरीशंकर खुराणा सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव,उत्तम निलावाड,तहसीलदार मारेगाव,

पद्माकर मडावी,गटविकास अधिकारी मारेगाव,जनार्धन खंडेराव,पोलीस निरीक्षक मारेगाव,शंकर हटकर,वनपरीक्षेत्र अधिकारी,मारेगाव,सुनील निकाळजे,तालुका कृषी अधिकारी मारेगाव,स्नेहदीप काटकर,गटशिक्षणाधिकारी मारेगाव,शैलेशकुमार पाटील, अभियंता,विद्युत महावितरण मारेगाव,समीर कुळमेथे,अध्यक्ष, जनहित कल्याण संघटना मारेगाव,रॉयल सय्यद,निलेश तेलंग,

कविताताई मडावी,अध्यक्षा जनहित कल्याण महिला संघटना, सुवर्णाताई खामणकर सचिव तसेच भास्कर धानफुले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हे राहणार आहेत.या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ख्यातनाम मार्गदर्शक,मराठी भाषा प्रमाणलेखन करणारे,पी.एच.डी.प्रबंधाचे मुद्रित शोधन तसेच पत्रकारिता क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असणारे दीपक रंगारी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यवतमाळच्या महिला जिल्हाध्यक्षा मा.सुनयना संजय येवतकर हे दोन्ही मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहे.

या गुणगौरव सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना भविष्यात कामी पडेल असे मार्गदर्शन केले जाणार आहे.या कार्यक्रमाला युवकांनी मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शवावी असे आवाहन पुरोगामी पत्रकार संघटना ता.मारेगाव यांचेकडून करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर