ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

बोरी (गदाजी) येथील उत्कंठावर्धक गोटमार संपन्न

85 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गोटमार बघायला उसळला अलोट जनसागर

यात्रा उत्सवाला आज पासून सुरुवात

सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील उत्कंठावर्धक भव्य गोटमार आज संपन्न झाली असुन गोटमार बघायला मोठ्या संख्येने असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.हि यात्रा आज दिनांक २५ मार्च २०२४ रोज सोमवार पासुन भव्य यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे.

बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा आहे.राज्यासह लगतच्या राज्यातही ही यात्रा प्रसिद्ध आहे.गावाला लागूनच वाहणाऱ्या छोट्याश्या उगम पावणाऱ्या नाल्याच्या बाजूला श्री. संत गदाजी महाराज यांचे मंदिर आहे.धुलीवंदणाच्या दिवशी येथे यात्रेचे आयोजन कमेटी तर्फे करण्यात येते.

सकाळी कबड्डी खेळानंतर गावातून एका जीवंत व्यक्तीची अंत्ययात्रा (मढ मिरवणूक) काढली गेली.सकाळी ११ वाजता अंगावर शहारे आणणाऱ्या गोटमारिला सुरुवात झाली.मंदिरा शेजारी मचान उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात. मचानीवर असलेले भाविक जमीनी वरील भाविकांवर गोटमार करत होते तर जमीनी वरील भाविक माळ्यावरील भाविकावर गोटमार करीत होते.

जवळपास १ ते १:३० तास हा खेळ सुरू होता.जेव्हा भक्ताला दगड लागुन जखमी होऊन भक्त जमिनीवर कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवुन जखमी भक्ताला मंदिरात घेवुन जातात.व गदाजी महाराजांच्या मंदिरातील रक्षा लावल्यानंतरच तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहीती गावकऱ्याकडून प्राप्त झाली आहे.

आज पासुन सुरु झालेली हि यात्रा तिन दिवस असुन दिनांक २८ मार्च २०२४ रोज गुरुवारला पाखड पुजा करण्यात येणार आहे.आज पासुन भाविकांनी दर्शनासाठी व यात्रेचा लाभ घेण्याचे विश्वस्तांनी आवाहन देवस्थान कमिटी तथा समस्त ग्रामवासी बोरी (गदाजी), ता.मारेगांव, जि.यवतमाळ यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर